सधनांना आरक्षण नको-सुप्रिया सुळे
By admin | Published: April 20, 2017 05:59 AM2017-04-20T05:59:49+5:302017-04-20T05:59:49+5:30
मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. आरक्षण देत असताना सधन किंवा आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींना वगळावे
जळगाव : मराठा, धनगर व मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. आरक्षण देत असताना सधन किंवा आर्थिक स्थिती चांगली असलेल्या व्यक्तींना वगळावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले.
जे आर्थिक दुर्बल आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल, असे म्हटले होते. त्यांचे आश्वासन कुठे गेले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
जळगावच्या नूतन मराठा महाविद्यालयात सुळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
तीन अपत्ये असलेल्या व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढू शकत नाही. पण हाच
नियम विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी लागू नाही.
तो लागू होण्यासाठी आपण
प्रयत्न कराल का, असा प्रश्न सुळे यांना एका विद्यार्थिनीने केला,
त्यावर मी लोकसभेत नक्कीच हा मुद्दा मांडीन. त्यासाठी कायदा करण्यासाठी प्रयत्न करीन. (प्रतिनिधी)