साध्वींना स्नानासाठी स्वतंत्र जागा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2015 03:30 AM2015-09-11T03:30:55+5:302015-09-11T03:30:55+5:30
पर्वणीच्या दिवशी दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर (रामकुंड ते नारोशंकर मंदिर) साध्वींना शाहीस्नानासाठी प्रशासनाने स्वतंत्र जागा द्यावी, या मागणीसाठी साध्वी त्रिकाल
नाशिक : पर्वणीच्या दिवशी दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर (रामकुंड ते नारोशंकर मंदिर) साध्वींना शाहीस्नानासाठी प्रशासनाने स्वतंत्र जागा द्यावी, या मागणीसाठी साध्वी त्रिकाल भवंता यांनी दिलेला तक्रार अर्ज वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावला.
साध्वींच्या परी आखाड्याच्या वतीने महिन्याभरापूर्वी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मध्यस्थांमार्फत तडजोड घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो असफल राहिल्याने नंतर न्यायालयात त्यावर सुनावणी झाली. यामध्ये तीनही आखाड्यांच्या महंतांंसह जिल्हाधिकारी हे पक्षकार होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत उभय बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर हा अर्ज न्यायालयाने फेटाळला.क़ज