साडूनेच केला साडूचा अपहरण करुन खून
By Admin | Published: August 27, 2016 06:47 PM2016-08-27T18:47:00+5:302016-08-27T18:47:00+5:30
घरगुती वादातून मित्रांच्या मदतीने साडूचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे
>- ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 27 - घरगुती वादातून मित्रांच्या मदतीने साडूचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून दिला होता. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत साडूसह तिघांना जेरबंद केले. तर, पत्नी आणि मेहुण्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्रवीण उपदेशी (35, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी साडू राहुल डोंबरे (वय 24, रा. पिंपरी), त्याचे मित्र अक्षय माने (वय 2क्), संकेत खंडागळे (वय 2क्, रा. शिवाजीनगर) यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, प्रवीण आणि राहुल हे दोघे नात्याने एकमेकांचे साडू आहेत. प्रवीण याचे सहा वर्षापूर्वी लग्न झाले आहे. प्रवीण आणि त्याच्या पत्नीचे नेहमी कौटुंबिक कारणातून भांडणो होत होती. यावरून दोघांनीही पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. दरम्यान, 23 ऑगस्ट रोजी प्रवीण घरी आले नाही. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या भाच्याने पिंपरी पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर प्रवीणची दुचाकी पोलिसांना चिंचवड येथील मॉलनजीक सापडली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी शुक्रवारी संशयावरून प्रवीणचा साडू राहुल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्रवीणबाबत विचारणा केली असता तो उडवाउवीडीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. पोलिसी खाक्या दाखवताच राहुलने हकिकत सांगितली. मित्रंच्या साथीने प्रवीणचे अपहरण करून गळा आवळून त्याचा खून केल्याचे कबूल केले.
पुरावा नष्ट करण्यासाठी प्रवीणचा मृतदेह ताम्हिणी घाटात फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास प्रवीण यांचा मृतदेह बाहेर काढला. राहुल याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, प्रवीण याची प}ी आणि मेहुण्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 31 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.