भगवा झंझावात

By admin | Published: November 7, 2016 06:58 AM2016-11-07T06:58:59+5:302016-11-07T06:58:59+5:30

मराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर उठलेले भगवे वादळ रविवारी अखेर मुंबईत धडकले.

Saffron storm | भगवा झंझावात

भगवा झंझावात

Next

चेतन ननावरे, मुंबई
मराठा समाजाला आरक्षण आणि कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी, या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर उठलेले
भगवे वादळ रविवारी अखेर मुंबईत धडकले. महामोर्चाची रंगीत तालीम
म्हणून रविवारी निघालेल्या बाइक रॅलीने सर्वच रेकॉर्ड तोडले. नागपूर येथील शेवटच्या मोर्चानंतर मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईमध्ये महामोर्चा
काढला जाईल. या बाइक रॅलीवरून या महामोर्चाच्या भगव्या वादळाची कल्पना येईल, अशी प्रतिक्रिया मुख्य संयोजक वीरेंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोमय्या मैदानाजवळून निघालेल्या या रॅलीत सुमारे सव्वा लाख बाइक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला. छत्रपती शिवाजी टर्मिनससमोर पोहोचलेल्या या रॅलीचे शेवटचे टोक चेंबूरला होते. नागपूरमधील मोर्चादरम्यान सरकारने मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहनही पवार यांनी केले. ‘बाइक रॅली तो झाँकी हैं, मुंबई अभी बाकी हैं’, असे म्हणत पवार यांनी महामोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांना केवळ महिन्याभराचा अवधी देत मराठा क्रांती मूक मोर्चा संयोजन समिती आता मुंबईतील महामोर्चाच्या तयारीला लागली आहे.
राज्यातील इतर मूक मोर्चांप्रमाणेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणतीही घोषणा न देता बाइक रॅलीचे नेतृत्व महिलांनी केले. सुरुवातीला महिला, त्यानंतर महिला चालक व पुरुष सहचालक आणि शेवटी पुरुष चालक अशी या रॅलीची रचना होती. मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा उभारण्यात आली होती. त्याला बाइकवरील सहचालक वंदन करून पुढे सरकत होते.
मूक मोर्चांप्रमाणेच बाइक रॅलीतही शिस्तीचे दर्शन घडले. रॅलीत वापरलेले नेटवर्क मुंबईतील महामोर्चातही
वापरले जाईल, अशी माहिती रॅलीच्या संयोजक समितीमधील एका सदस्याने ‘लोकमत’ला दिली.


नेत्यांची गर्दी
आमदार भाई जगताप, आमदार भरत गोगावले यांच्यासह शिवसेना नेते विनोद घोसाळकर, अभिनेता सुशांत शेलार यांसह अनेक नेते व सेलिब्रिटी या मोर्चात सहभागी झाले होते.
मुंबईच्या डबेवाल्यांसह लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी, एसटी कर्मचाऱ्यांचे नेते श्रीरंग बरगे यांसारखे अनेक संघटना आणि मंडळांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

Web Title: Saffron storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.