बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू -  संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 12:09 PM2021-09-03T12:09:28+5:302021-09-03T12:10:32+5:30

Sanjay Raut : बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

Saffron will fall on Belgaum Municipal Corporation, we will win more than 30 seats - Sanjay Raut | बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू -  संजय राऊत

बेळगाव महापालिकेवर भगवाच फडकेल, 30 पेक्षा अधिक जागा जिंकू -  संजय राऊत

googlenewsNext

मुंबई :  बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.

शुक्रवारी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण आणि इतर आमचे मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 

मीही प्रचाराला जाणार होतो, पण प्रचाराला गेल्याने एकीकरण समितीवर कर्नाटक सरकारचा दहशतवाद नको म्हणून आम्ही त्यांना इथूनच मदत करायचे ठरवले आहे. तसेच,  मराठी सत्ता असलेली महानगरपालिका द्वेषबुद्धीने बरखास्त केली. भगवा उतरवला, असे अनेक कृत्य कर्नाटक सरकारने लोकशाहीची हत्या करून घडवून आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

कर्नाटक लोकसभा पोटनिवडणुकीत समितीचे शुभम शेळके त्यांना लाखावर मते पडली होती. एकजूट चांगली होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर सर्व मिळून आम्ही 30च्या आसपास जागा जिंकू. पुन्हा एकदा बेळगाव पालिकेवर महाराजांचा भगवा झेंडा फडकेल. तसेच उत्साही वातावरण दिसत आहे.  मराठी जनतेला आवाहन आहे, एकजुटीने मतदान करा. मराठी म्हणून मतदान करा. बेळगाववर मराठी माणसाचीच सत्ता आहे, हे सिद्ध करण्याची एक संधी आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

385 उमेदवार  रिंगणात 
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत 58 प्रभागांसाठी मतदान होणार असून एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप 55,काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जे डी एस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 असे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 428364 इतके मतदार असून त्यामध्ये  213536 पुरुष आणि 214834 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 415 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 

1828 कर्मचारी नियुक्त 
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी 1828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी आणि एक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यांच्या व्यतिरिक्त सहा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. 300 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.
 

Web Title: Saffron will fall on Belgaum Municipal Corporation, we will win more than 30 seats - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.