सहकाराला गरज संस्कारांची

By admin | Published: January 19, 2016 03:43 AM2016-01-19T03:43:25+5:302016-01-19T03:43:25+5:30

गेल्या काही वर्षांत सहकाराला स्वाहाकाराचे स्वरूप आले होते. साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहकारात संस्कारित भावनेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Sahakar's needs | सहकाराला गरज संस्कारांची

सहकाराला गरज संस्कारांची

Next

नाशिक : गेल्या काही वर्षांत सहकाराला स्वाहाकाराचे स्वरूप आले होते. साखर कारखानदारी टिकविण्यासाठी सहकारात संस्कारित भावनेने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३०व्या गळीत हंगामाचा त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. वसाका कारखाना कोमात गेलेल्या रुग्णांसारखा झाला होता. आ. राहुल अहेर यांनी पाठपुरावा करून तो सुरू केला. तो पुढेही चांगल्या पद्धतीने चालू राहिल्यास देशातील ते एकमेव उदाहरण ठरेल. कामगारांनीही एकेक पैसा वाचवून कारखान्याच्या उज्ज्वल भविष्याचे साक्षीदार झाले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, भविष्यात पाण्यासाठी संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. आताच रावणाचे पुतळे जाळले नसतील,
तेवढे माझे पुतळे पाण्यावरून जाळले गेले आहेत, परंतु मीही शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्यांच्या भावना मला समजतात.
जळगावमध्ये ठिबक सिंचनातून शेती फुलली आहे. इतरांनीही तसे प्रयत्न करावेत, असे महाजन म्हणाले. (प्रतिनिधी)
गैरव्यवहार शोध मंत्री : जलसिंचन मंत्री महाजन यांनी त्यांचे पहिले वर्ष गैरव्यवहार शोधण्यातच घालविले. त्यामुळे त्यांना सिंचनमंत्री की गैरव्यवहार शोधणारे मंत्री म्हणावे, असा प्रश्न पडल्याचे फडणवीस यांनी सांगताच सर्वत्र हशा पिकला. सर्व जलसिंचन योजना पूर्ण होतील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. शिर्डीच्या विमानतळाची उभारणी राज्य शासन स्वबळावर करीत आहे. २०१७-१८ हे साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष आहे. त्यादृष्टीने तेथील विमानतळाचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नागपूर येथील मिहान प्रकल्पाच्या कामाचा व या प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यांच्या पुनर्वसन आणि त्यांच्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधांचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी या वेळी घेतला. राज्यातील विविध जिल्ह्यांतील विमानतळांच्या कामाच्या प्रगतीचा तसेच त्यासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन, निधी वितरण, सुविधा आदींचा आढावाही घेण्यात आला.

Web Title: Sahakar's needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.