नाना पाटेकर यांना सह्याद्री नवरत्न पुरस्कार

By Admin | Published: May 12, 2016 03:15 AM2016-05-12T03:15:47+5:302016-05-12T03:15:47+5:30

मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे

Sahanadri Navratna Award for Nana Patekar | नाना पाटेकर यांना सह्याद्री नवरत्न पुरस्कार

नाना पाटेकर यांना सह्याद्री नवरत्न पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘सह्याद्री नवरत्न’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना चित्ररत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, तर संगीतकार अजय-अतुल संगीतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्याचप्रमाणे उद्योजक अनिल जैन यांना वैभवरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सह्याद्री वाहिनीच्या वतीने संगीत, चित्रपट, शिक्षण, नाट्य, क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना ‘नवरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ‘नवरत्न’ पुरस्कारांचे हे १५ वे वर्ष असून सुरुवातीपासून ^^‘^^गोदरेज’ या सोहळ्याचे प्रायोजक आहे़ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘नवरत्न’ पुरस्कार सोहळा होणार आहे. ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, उद्योजक विजय कलंत्री, लेखिका गिरिजा काटदरे यांनी यंदा परीक्षक म्हणून काम पाहिले.
> १५ व्या ‘नवरत्न’ पुरस्कारांचे मानकरी
साहित्यरत्न - डॉ. विजया राजाध्यक्ष (लेखिका)
नाट्यरत्न- रामदास कामत (गायक)
संगीतरत्न - अजय- अतुल (संगीतकार)
चित्ररत्न - नाना पाटेकर (अभिनेता)
शिक्षणरत्न - डॉ. विजया वाड (शिक्षण तज्ज्ञ)
रत्नदर्पण - राधाकृष्ण नार्वेकर (ज्येष्ठ पत्रकार)
रत्नवैभव - अनिल जैन (उद्योजक)
सेवारत्न - विजय पळणीकर (सेवाभावी कार्यकर्ते)
कलारत्न - अच्युत पालव (सुलेखनकार)
‘फेस आॅफ द इयर’ पुरस्कार - प्रार्थना बेहरे (अभिनेत्री)

Web Title: Sahanadri Navratna Award for Nana Patekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.