साहित्य संमेलनाध्यक्ष सासणो की मोरे?
By admin | Published: December 9, 2014 12:34 AM2014-12-09T00:34:15+5:302014-12-09T00:34:15+5:30
घुमान (पंजाब) येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते,
Next
पुणो : घुमान (पंजाब) येथे एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे बुधवारी (दि. 1क्) स्पष्ट होणार आहे. यंदाची निवडणूक चौरंगी होत असली, तरी खरी लढत डॉ. सदानंद मोरे आणि भारत सासणो यांच्यात असल्याची चर्चा साहित्य वतरुळात आहे. आज सायंकाळी 7 वाजेर्पयत मतपत्रिका देण्याची मुदत आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. या निवडणुकीत डॉ. मोरे, सासणो यांच्यासह डॉ. अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे रिंगणात आहेत. सोमवार सायंकाळर्पयत 1क्74 मतदारांपैकी 66क् मतदारांनी मतपत्रिका जमा केल्या आहेत. मंगळवारी सायंकाळर्पयत विदर्भातून 16क्, मराठवाडय़ातून 1क्8, मुंबईतून 64, हैदराबादमधून 26, छत्तीसगडमधून 9, मध्य प्रदेशातून 1क्, तर गोव्यातून 18 मतपत्रिका येतील, असे निर्वाचन अधिकारी अॅड. प्रमोद आडकर यांनी सांगितले. मतपत्रिका गठ्ठय़ाने घेऊन येण्यास सकाळपासूनच सुरुवात होणार आहे. सुरुवातीस फ्रॅँकिंग करून मतपत्रिका मतदारांना पाठविण्यात आल्या होत्या; पण काही मतदारांना मतपत्रिका मिळाल्या नाहीत. दुबार मतपत्रिका घेणा:यांची संख्या 175 आहे. त्यांना स्पीडपोस्टद्वारे मतपत्रिका पाठविल्या आहेत. मूळ मतपत्रिका मतदारास कालांतराने मिळाल्यास जी मतपत्रिका आधी मिळेल, ती ग्राह्य धरण्यात येणार आहे.
(प्रतिनिधी)
4आज (दि. 9) सायंकाळी 7 वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतपेटी बंद केली जाणार आहे. मतमोजणीला बुधवारी (दि. 1क्) सकाळी 9 वाजता सुरुवात होणार आहे. एकल पद्धतीने मतगणना होणार आहे. दुपारी 1 वाजेर्पयत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.