‘सह्याद्री’त पाच वाघोबांचा वावर!

By admin | Published: January 21, 2015 01:52 AM2015-01-21T01:52:12+5:302015-01-21T01:52:12+5:30

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच वाघ असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) शिक्कामोर्तब केले आहे

'Sahyadri' five vagabonds! | ‘सह्याद्री’त पाच वाघोबांचा वावर!

‘सह्याद्री’त पाच वाघोबांचा वावर!

Next

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच वाघ असल्याबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) शिक्कामोर्तब केले आहे. या क्षेत्रात कोयना व चांदोली अभयारण्यांचा समावेश होतो.
२०१४ मध्ये ‘एनटीसीए’च्या तीन सदस्यांच्या समितीने ‘सह्याद्री’ला भेट दिली होती. वाघांचे अस्तित्व मान्य करण्यासाठीचे निकष अत्यंत कठीण होते. वाघाचे प्रत्यक्ष दर्शन आणि जमा केलेल्या नमुन्यांमधील केवळ ‘डीएनए’ यावरच भरवसा ठेवला जाणार होता. प्रशासनाने एकंदर ११ नमुने पाठविले होते.
पाटण तालुक्यातील पाच गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर तेथील शेतजमिनीत नैसर्गिक कुरणे तयार करण्यात येऊन त्यावर तृणभक्षी वन्यजीव चांगल्या प्रकारे पोसले जातील, याची दक्षता घेण्यात आली. तसेच सागरेश्वर अभयारण्य आणि पुण्याच्या राजीव गांधी उद्यानातून २० सांबर आणि चितळ आणून या भागात सोडण्यात आली. भविष्यात ही संख्या २०० पर्यंत वाढविण्यात येणार असल्याने वाघोबांना भरपूर भक्ष्य उपलब्ध होऊन त्यांची संख्या वाढणार आहे. वाघांसाठी नवे पाणवठेही तयार केले जात आहेत.
‘सह्याद्री’च्या व्यवस्थापनाबद्दल मागील वेळेपेक्षा अव्वल गुणांकन यावेळी प्राप्त झाले आहे. एकंदर ४७ निकष त्यासाठी लावण्यात आले. सर्वसाधारण व्यवस्थापन, पुनर्वसन, संयुक्त वनव्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, पर्यटन सुविधांमध्ये वाढ, असे हे निकष आहेत. (प्रतिनिधी)

वाघांचे भक्ष्य वाढविण्याबरोबरच मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने जावळी तालुक्यातील सात गावांचे पुनर्वसन प्रस्तावित असून, क्षेत्र निवड पूर्ण झाली आहे. बफर झोनमध्ये परिस्थितीचा विकास करून संतुलन राखले जाईल.
- एम. एम. पंडितराव,
उपवनसंरक्षक (वन्यजीव),
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

Web Title: 'Sahyadri' five vagabonds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.