रेल्वे तिकिटासोबत साई दर्शनाचा पास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 05:31 AM2019-01-28T05:31:27+5:302019-01-28T05:31:45+5:30
साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. या सुविधेचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी करण्यात आला.
शिर्डी : साईदर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे तिकिटासोबत दर्शनपासही आरक्षित करता येणार आहे. या सुविधेचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी करण्यात आला. शिर्डीमध्ये खास साईबाबांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांना आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून रेल्वे तिकीट बुक करताना दर्शनाचे पासेस आरक्षित करता येतील. ही सुविधा फक्त साईनगर-शिर्डी, कोपरगाव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्टेशनचे रेल्वे तिकीट आरक्षित करणाºया साईभक्तांसाठी उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देणारे साईबाबा संस्थान हे देशातील पहिले देवस्थान ठरले आहे. तसेच, संस्थानच्या वेबसाइटद्वारे यापुढे आरतीसह सत्यनारायण व अभिषेक पूजेची तिकिटेही आगाऊ आरक्षित करता येणार आहे.
बचत दहा कोटींची
या सुविधांसाठी टाटा कन्सल्टन्सीने सॉफ्टवेअर विकसित केले आहे़ त्यांनी रेल्वे तिकिटाबरोबर दर्शन पासेससह संस्थानला आॅनलाइनच्या सर्व सुविधा विनामूल्य दिल्या आहेत़ त्यामुळे संस्थानची वर्षाकाठी किमान दहा कोटी रुपयांची बचत होणार आहे़