साई संस्थान भाजपाकडे !
By admin | Published: July 12, 2015 02:58 AM2015-07-12T02:58:24+5:302015-07-12T02:58:24+5:30
साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद भाजपाला तर सिद्धिविनायकचे शिवसेनेला द्यायचे निश्चित झाले आहे़ सत्तेतील सहभागाच्या प्रमाणात सहकारी पक्षांना जागा
शिर्डी : साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद भाजपाला तर सिद्धिविनायकचे शिवसेनेला द्यायचे निश्चित झाले आहे़ सत्तेतील सहभागाच्या प्रमाणात सहकारी पक्षांना जागा देऊन अधिवेशनानंतर संबंधित विश्वस्त मंडळाच्या नेमणुका करण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली़
नाशिक कुंभमेळ््यासाठी शासनाने मोठा निधी दिला असून राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच सरसंघचालकांना निमंत्रित करण्यात आले आहे़ साई समाधी शताब्दीला केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नाशिक-त्र्यंबकेश्वरला कुंभमेळ््यासाठी येणाऱ्या भाविकांपैकी २० ते २५ टक्के भाविक शिर्डी व शिंगणापूरला येण्याची शक्यता आहे़ त्यादृष्टीने दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, वाहनतळे, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहे, वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते आदींची सुविधा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
चौकशी करून कारवाई
संस्थानच्या सुरक्षारक्षकाला मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.