साईंना परमेश्वर मानण्यात गैर नाही
By admin | Published: September 20, 2014 02:24 AM2014-09-20T02:24:21+5:302014-09-20T02:24:21+5:30
हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत़ त्यात साईबाबांचा समावेश केला तर गैर काहीच नाही. कणाकणात परमेश्वरांचा अंश असतो असे मानणारी आमची संस्कृती आह़े
Next
शिर्डी (जि.अहमदनगर) : हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत़ त्यात साईबाबांचा समावेश केला तर गैर काहीच नाही. कणाकणात परमेश्वरांचा अंश असतो असे मानणारी आमची संस्कृती आह़े साईबाबा तर त्यापेक्षा मोठे आहेत़ त्यामुळे त्यांच्यातही परमेश्वर आहेच़ पण कदाचित शंकराचार्याना हे दिसत नसेल, असे परखड मत प्रयाग येथील महिला परी आखाडय़ाच्या प्रमुख जगतगुरू शंकराचार्य त्रिकाल भवन्ता यांनी येथे व्यक्त केल़े
त्रिकाल भवन्ता महाराज यांनी शुक्रवारी शिष्यांसह दर्शनासाठी साईदरबारी हजेरी लावली़ साईबाबांना परमेश्वर मानणो किंवा न मानणो हा श्रद्धेचा भाग आह़े करोडो भाविक साईबाबांना गुरू मानतात़ गुरूचे स्थान परमेश्वराहुनही मोठे असत़े त्यामुळे बाबांना परमेश्वर मानणो काहीच गैर नसल्याचे त्यांनी सांगितले. शंकराचार्यानी बाबांच्या देवत्वावर आक्षेप घेणो किंवा त्यांच्या मूर्ती हटवण्याच्या सूचना देणो गैर आह़े हा आस्थेचा विषय असून आपण त्यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
महिला घरापासून राजकारणार्पयत सर्वत्र स्वच्छता करतात़ महिला संत धर्माचीही साफसफाई करतील़ त्यासाठी आम्ही पुढाकार घेतल्याचेही त्या म्हणाल्या़ महिलांवर होणारे अत्याचार हे धर्मगुरूंचे अपयश असल्याचे सांगत प्रत्येक महिलेकडे माता-भगिनीच्या दृष्टीने बघितल्यास असे प्रकार होणार नाहीत, असा दावा करीत मुलींच्या आखुड कपडय़ांमुळे अशा घटना घडत असल्याचा त्यांनी इन्कार केला़