सैफी रुग्णालयाने केली इमानच्या बहिणीची तक्रार

By admin | Published: April 29, 2017 02:59 AM2017-04-29T02:59:09+5:302017-04-29T02:59:09+5:30

जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इमान अहमदच्या उपचारांबाबत तिची बहीण शायमा आणि डॉक्टर यांच्यातील वाद-प्रतिवाद

Saifi Hospital complains to Iman's sister | सैफी रुग्णालयाने केली इमानच्या बहिणीची तक्रार

सैफी रुग्णालयाने केली इमानच्या बहिणीची तक्रार

Next

मुंबई : जगातील सर्वांत लठ्ठ महिला अशी ओळख असणाऱ्या इमान अहमदच्या उपचारांबाबत तिची बहीण शायमा आणि डॉक्टर यांच्यातील वाद-प्रतिवाद आता विकोपाला पोहोचला आहे. इमान अहमदच्या उपचारांविषयी तिची बहीण शायमा डॉक्टरांचा सल्ला ऐकत नसल्याची लेखी तक्रार सैफी रुग्णालय प्रशासनाने व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्यात केली आहे. शायमच्या अशा वागणुकीमुळे इमानच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, असेही रुग्णालय प्रशासनाने तक्रारीत म्हटले आहे.
५०० किलो वजनाच्या इमानचे उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरचे वजन १७६ किलो एवढे आहे. चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार, इमानला नळीद्वारे आहार दिला जातो. मात्र डॉक्टरांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करीत शायमाने इमानला थेट मुखावाटे पाणी दिले. त्यामुळे शायमाच्या या वागणुकीले कंटाळलेल्या रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यात तिच्याविषयी लेखी तक्रार केली. या तक्रारीत शायमा डॉक्टरांच्या उपचार पद्धतींचे उल्लंघन करत असल्याचे नमूद केले आहे.
सैफी रुग्णालयाचे चिफ आॅपरेटींग आॅफिसर हुजैफा शेहाबी यांनी सांगितले की, डॉ.मुफ्फझल लकडावाला आणि त्यांच्या चमूने इमानवर केलेल्या उपचारांमुळे तिच्यात प्रचंड सुधारणा झाली आहे.इमानला दर दोन तासांनी नळीद्वारे आहार दिला जातो. याविषयी, शायमालाही पूर्ण कल्पना असून तरीही तिने थेट मुखावाटे इमानला पाणी दिले. दुसरीकडे शायमाने सैफी रुग्णालय प्रशासनाचे आरोप फेटाळले आहेत. ती म्हणाली, इमान पाणी पिऊ शकत नाही याविषयी डॉक्टरांनी कळविले नाही. इमानला पाणी हवे होते. म्हणून मी तिला पाणी दिले.यात माझाी काहीही चूक नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Saifi Hospital complains to Iman's sister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.