संत गजानन महाराजांनीही केली होती वारी
By admin | Published: July 8, 2014 11:33 PM2014-07-08T23:33:35+5:302014-07-08T23:33:35+5:30
संत गजानन महाराजांच्या इतिहासचा धांडोळा घेतला असता महाराजांनीही वारी केल्याची माहिती समोर येते.
शेगाव: ङ्म्री संत गजानन महाराजांच्या इतिहासचा धांडोळा घेतला असता महाराजांनीही वारी केल्याची माहिती समोर येते. शेगाव येथील ङ्म्री संत गजानन महाराज संस्थांनची मुहुर्तमेढ ङ्म्रींच्या समक्षच रोवल्या गेली होती. त्यामुळे या संस्थानने वारीची परंपरा आजतागायत सांभाळली आहे. संस्थानचे पहिले व्यवस्थापक पुरुषोत्तमभाऊ पाटील यांनी १९४८ साली धुरा सांभाळली अन् १९६८ पासून पंढरीची पायी वारी संस्थानने सुरु केली. स्वत: पुरुषोत्तमभाऊ पाटील हे निस्सीम वारकरी होते. विणा घेऊन गजाननाचा नामघोष करीत ते ह्यवारीह्ण करीत असत. ही ह्यवारीह्ण अविरतपणे सुरु असून संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील, विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनीही वारकर्यांसोबत वारी करून ह्यपाटीलह्ण घराण्यातील वारसांनी वारी करण्याची परंपराही आजही कायम राखली आहे. इतिहासाचा धांडोळा घेतला असता ङ्म्रींच्या वारी संदर्भातील अनेक नोंदी हाती लागतात. १८ जुलै १९१0 च्या आषाढीची वारी सुद्धा ह्यङ्म्रीह्ण नी केल्याचा दाखला संत गजानन विजय गं्रथात मिळतो, या ह्यवारीह्ण नंतरच ङ्म्री गजानन महाराजांनी अवतार कार्य संपविण्याचे सूतोवाच केले होते. आषाढीचा सोहळा झाल्यानंतर २६ जुलै १९१0 रोजी विठ्ठल मंदिरातच यासंदर्भात ङ्म्रींचे भक्त हरि पाटील यांना ङ्म्रींनी यासंदर्भात कल्पना दिली असल्याची नोंद आढळते.त्यामुळेच शेगावच्याह्यवारीह्णच्या या पंरपरेला भावनेचा स्पर्श आहे. शेगावची वारी ही अश्व, गज यांच्यासह पंढरीत दाखल होते. अतिशय शिस्तबद्ध अशी या वारीची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे.