संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन

By admin | Published: November 1, 2016 03:23 AM2016-11-01T03:23:45+5:302016-11-01T03:23:45+5:30

ज्ञानमयी या संस्कृती संकुलाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. ग.वा. करंदीकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.

Saint literature scholar W Karandikar passed away | संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन

संत साहित्याचे अभ्यासक ग. वा. करंदीकर यांचे निधन

Next


पुणे : मराठीचे निवृत्त प्राध्यापक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, गीता धर्म मंडळाचे माजी सहकार्यवाह आणि ज्ञानमयी या संस्कृती संकुलाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. ग.वा. करंदीकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, कन्या, नातवंडं असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुसद येथील फु. ना. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा बजावली. येथील वास्तव्यात त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या ज्ञानवर्धिनी या संस्थेच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले. ते स्वत: कुशल अभिनेते, उत्तम नाट्यदिग्दर्शक आणि विविध सांस्कृतिक संस्थांचे मार्गदर्शक होते. वयाच्या ७५ व्या वर्षी पीएच.डी. पदवी मिळविणारे. प्रा. करंदीकर यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण कोश या ग्रंथाच्या पुरवणीचे केलेले संपादन गाजले होते.

Web Title: Saint literature scholar W Karandikar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.