साईची ‘सबुरी’ संपली, महायुतीला तडा

By admin | Published: July 12, 2014 12:32 AM2014-07-12T00:32:43+5:302014-07-12T00:32:43+5:30

महायुतीतील साई पक्षाने पालिकेतील युती कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिल्याने, महायुतीतील वाद चव्हाटयावर आला आहे.

Sai's 'Saburi' is over; | साईची ‘सबुरी’ संपली, महायुतीला तडा

साईची ‘सबुरी’ संपली, महायुतीला तडा

Next
उल्हासनगर : महायुतीतील साई पक्षाने पालिकेतील युती कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिल्याने, महायुतीतील वाद चव्हाटयावर आला आहे.  पक्षाच्यावतीने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याची भाषा केली जात आहे.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेच्या चाव्या 8 नगरसेवक निवडून आलेल्या साई पक्षाच्या हाती आल्या.   शिवसेना-भाजपा नेत्यांनी 
पालिकेवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी साई पक्षाला महायुतीत घेऊन  महापौर पद साई पक्षाला दिले आहे.  महायुतीतील अंतर्गत करारनाम्यानुसार महापौर आशा इदनानी यांनी महापौर पदाचा राजिनामा न दिल्याने, महापौर नाटयाने अवघे शहर ढवळून निघाले होते.  तसेच महापौरासह आमदार कुमार आयलानी, उपमहापौर जमनुदास पुरस्वानी, व साई पक्षाच्या नगरसेवकांना शिवसैनिकांनी मारहाण व धक्काबुक्कीकरण्याचा प्रकार झाला होता.    
लोकसभा निवडणुकीत साई पक्षाने महायुतीच्या श्रीकांत शिंदे यांना सशर्त पाठिंबा दिला होता.  विधानसभा निवडणुकीतही साई पक्ष महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची चिन्हे होती.  मात्र पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांनी बंडाचा ङोंडा महायुतीतील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.  विधानसभा निवडणुकीत साई पक्षाने वेगळी चूल मांडल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर विधानसभा क्षेत्रत, शहरातील कॅम्प नं-1,2 व 3 परिसरासह वरप, कांबा म्हारळ गावाचा समावेश आहे.  विधानसभा क्षेत्रत राष्ट्वादी पक्षाचे-17 नगरसेवक असून कॉग्रेस पक्षाचे-2, मनसेचा-1, साई पक्षाचे-9, भाजपाचे-8, शिवसेनेचे-6 व रिपाई आठवले गटाचे-4 नगरसेवक आहेत.   उल्हासनगर विधानसभा क्षेत्रत, महायुतीचे साई पक्षासह 27  नगरसेवक आहेत.   तर  कॉग्रेस- राष्ट्वादीचे-19 नगरसेवक आहेत.  महायुतीतील साई पक्षाने वेगळी चूल मांडल्यास महायुतीचे आमदार कुमार आयलानी यांना धोका निर्माण होणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा ज्योती कालानी यांनी ओमी कालानी यांचे नाव पुढे केले असून पप्पू कलानी याचे वारस म्हणून ओमी कालानी यांच्याकडे सिंधी समाज पहात आहे. परंतु, नवख्या ओमीला नॉन सिंधी समाज पाठिंबा देणार का?  हा खरा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)
 
च्भाजपातील अंतर्गत वादही अनेकदा चव्हाटयावर आले असून शिवसेना स्थानिक नेत्यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या बाबत वरिष्ठाकडे नाराजी व्यक्त केली आहे.  
च्महायुतीतील रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्यासह, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विधानसभेवर दावा सांगितला आहे. एकंदरीतच महायुतीतील वादामुळे  उल्हासनगर विधानसभेवर भगव्या ऐवजी तिरंगा फडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Web Title: Sai's 'Saburi' is over;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.