सार्इंना साडेपाच कोटींची गुरूदक्षिणा
By admin | Published: July 12, 2017 04:19 AM2017-07-12T04:19:33+5:302017-07-12T04:19:33+5:30
गुरूपौर्णिमा उत्सवात साईचरणी तब्बल साडेपाच कोटींची गुरूदक्षिणा अर्पण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : गुरूपौर्णिमा उत्सवात साईचरणी तब्बल साडेपाच कोटींची गुरूदक्षिणा अर्पण झाली आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी ही माहिती दिली़ ८ ते १० जुलै दरम्यान शिर्डीत १०९ वा गुरूपौर्णिमा उत्सव साजरा झाल्यानंतर संस्थानच्या दान पेट्यांची मोजदाद करण्यात आली़
दक्षिणा पेटीत २ कोटी ९४ लाख, देणगी कक्षात १ कोटी ४ लाख, डेबीट व क्रेडीट कार्डद्वारे २९ लाख ६७ हजार, आॅनलाईन देणगी २२ लाख ८० हजार, चेक व डीडीद्वारे देणगी ३१ लाख २० हजार, ५९ लाख रूपयांचे २२३३़९०० ग्रॅम सोने, २ लाख ४३ हजार रूपयांची ८४०१ ग्रॅम चांदी तसेच जवळपास वीस देशातील ९ लाख तीस हजारांच्या परकीय चलनाचा समावेश आहे़
संस्थानकडे सध्या जवळपास ४०० किलो सोने, साडेचार हजार किलो चांदी तर वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये १८०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.