पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप

By admin | Published: July 7, 2014 02:09 PM2014-07-07T14:09:14+5:302014-07-07T19:24:52+5:30

अ‍ॅड पल्लवी पूरकायस्थची हत्या करणारा वॉचमन सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Sajjadla Janmashap in Pallavi Puraskyasthal murder case | पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप

पल्लवी पूरकायस्थ हत्येप्रकरणी सज्जादला जन्मठेप

Next
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - अ‍ॅड पल्लवी पूरकायस्थ हत्या करणारा वॉचमन सज्जाद मुघलला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात आरोपी साजीद अहमद मुघलला दोषी ठरवले होते, अखेर आज त्याला मरेपर्यंत जन्मेठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पल्लवीचा निर्घृण खून करणा-या सज्जादला फाशी देण्यात यावी, अशी मागणी पल्लवीच्या पालकांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्याला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 
वडाळ्यातील एका उच्चभ्रू सोसाटीत राहणा-या पल्लवीचा मृतदेह आढळला होता. या घरात पल्लवी तिचा प्रियकर अविक सेनगुप्तासोबत राहत होती. याप्रकरणी पोलिसांनी साजीदला अटक केली होती. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी मुंबई सेंट्रल स्थानकातून त्याला अटक केली. त्याच्यावर खून, घुसखोरी व विनयभंगाचे आरोप लावण्यात आले होते. पल्लवीवर साजीदची पहिल्यापासून वाईट नजर होती़ त्या रात्री ती घरात एकटीच होती़ त्या वेळी साजीदने जाणीवपूर्वक लाइट बंद केल्या व घरात घुसला़ त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला़ पण तिने प्रतिकार केल्याने साजीदने तिचा खून केला होता.

Web Title: Sajjadla Janmashap in Pallavi Puraskyasthal murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.