साक्षरता दिन विशेष : शालाबाह्य मुलांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 07:00 AM2019-08-08T07:00:00+5:302019-08-08T07:00:18+5:30

शिक्षण हक्क कायदा अस्तिवात येऊन सुध्दा राज्यातील शालाबाह्य मुलांच्या प्रमाणात घट होत नसल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत होते. ..

saksharta din vishesh : The number of out-of-school children decreases | साक्षरता दिन विशेष : शालाबाह्य मुलांची संख्या घटली

साक्षरता दिन विशेष : शालाबाह्य मुलांची संख्या घटली

Next
ठळक मुद्दे बालरक्षक चळवळीचा परिणाम: शिक्षण विभागाचा दावा

राहुल शिंदे
पुणे : राज्याच्या शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत बालरक्षक चळवळीच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे ८० हजार शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणले आहे.त्यामुळे राज्यातील शालाबाह्य मुलांची संख्या घटली असून ‘असर’च्या अहवालातही ही बाब नमूद करण्यात आली आहे.परिणामी पुढील काळात राज्यातील साक्षरतेच्या प्रमाणात वाढ होईल,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिक्षण हक्क कायदा अस्तिवात येऊन सुध्दा राज्यातील शालाबाह्य मुलांच्या प्रमाणात घट होत नसल्याचे गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत होते. तसेच शालाबाह्य मुलांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांनी शासनाच्या कार्यपध्दतीवर टिका केली. त्यामुळे राज्य शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २०१७ मध्ये शालाबाह्य मुलांसाठी पूर्णवेळ काम करणा-या बालरक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील तब्बल २८ हजार शिक्षकांनी व शिक्षण अधिका-यांनी बालरक्षक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली. तसेच दोन वर्षांपासून शालाबाह्य मुलांना शाळेत प्रवेशित करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ४४ हजार ६०० शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आले. तर २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात ३५ हजार ३०४ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षात सुमारे ८० हजार विद्यार्थी बालरक्षकांच्या प्रयत्नामुळे वर्गात येऊन शिक्षण घेवू लागली.
बालरक्षक चळवळीमुळे मागील वर्षी इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गात ६ हजार ७८१ विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात आले तर ६ हजार १८६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत जावून शिक्षण घेणे शक्य झाले. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ४ हजार ४८१ शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील ३ हजार ७६१,नंदुरबार जिल्ह्यातील ३ हजार ५२७,नाशिकमधील ३ हजार ४८९,पालघरमधील २ हजार १७७ , बीडमधील १ हजार ७७१,जळगावमधील १ हजार ४९३,साता-यातील १ हजार ५३ शालाबाह्य मुले शाळेत दाखल करण्यात आली.
-------------


राज्यातील शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्गदर्शानाखाली बालरक्षक चळवळ अधिक प्रभावीपणे राबविण्यात आली.एकही मुलं स्थलांतरित होऊ नये यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर विशेष मोहिम राबविण्यात आली.शिक्षकांनी पुढे येऊन बालरक्षक चळवळीत सहभागी होवून दोन वर्षात तब्बल 80 हजार शालाबाह्य मुलांना शाळेत दाखल केले.चांगली कामगिरी बजावलेल्या बालरक्षकांचा येत्या 15 आॅगस्ट रोजी सत्कार केला जाणार आहे.
-डॉ.शोभा खंदारे,शिक्षण उपसंचालक,समता विभाग,एससीईआरटी ,पुणे

Web Title: saksharta din vishesh : The number of out-of-school children decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.