मुलीची विक्री; आईसह तिघे गजाआड
By admin | Published: June 27, 2017 01:52 AM2017-06-27T01:52:14+5:302017-06-27T01:52:14+5:30
विवाहाच्या नावाखाली आपल्या मुलीचा सौदा करणाऱ्या आईसह दोघांना लाखनी पोलिसांनी सोमवारी अटक केली. पाच वेळा विवाह लावून
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विवाहाच्या नावाखाली आपल्या मुलीचा सौदा करणाऱ्या आईसह दोघांना लाखनी पोलिसांनी सोमवारी अटक केली. पाच वेळा विवाह लावून मोडल्यानंतर पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुरू झाल्याने पीडिते तरुणीने शनिवारी रात्री आईविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
आई वेदांती (४७) (बदललेले नाव), ओम वामन कटरे (२७) आणि उमेश मेश्राम (२७) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ओम आणि वामन यांच्याशी वेदांतीने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले होते आणि नंतर ते तिने मोडलेही होते.
ही २१ वर्षीय पीडित मुलगी लाखनी तालुक्यातील गराडा येथे एका साधारण कुटुंबातील आहे. २०१२पासून तिच्या आईने तिचे पाचवेळा लग्न लावून सौदा केला होता. काही दिवस संसार सुरळीत चालल्यानंतर पीडितेची आई तिचे लग्न मोडून मुलीला घरी आणायची. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मुलीच्या लग्नासाठी तरुणाचा शोध घेत पैसे देणाऱ्यासोबत लग्न लावून देण्याचा प्रकार तिची आई करीत होती. पीडित मुलीने केलेल्या या गंभीर तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.