भाईंदरमध्ये किराणा दुकानातून देशी दारू-बियरची विक्री; दुकानदाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:25 PM2022-01-08T17:25:49+5:302022-01-08T17:26:29+5:30

भाईंदरच्या गणेशदेवल नगरमध्ये चक्क किराणा दुकानातून बेकायदेशीरपणे देशी दारू व बियरची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून गुन्हा दाखल करून दुकानदारास ताब्यात घेतले आहे.

Sale of local liquor beer from a grocery store in Bhayander Shopkeeper arrested | भाईंदरमध्ये किराणा दुकानातून देशी दारू-बियरची विक्री; दुकानदाराला अटक

भाईंदरमध्ये किराणा दुकानातून देशी दारू-बियरची विक्री; दुकानदाराला अटक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड -

भाईंदरच्या गणेशदेवल नगरमध्ये चक्क किराणा दुकानातून बेकायदेशीरपणे देशी दारू व बियरची विक्री केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला असून गुन्हा दाखल करून दुकानदारास ताब्यात घेतले आहे.

भाईंदरच्या गणेशदेवल नगर, नितीन चाळीतील भवानी किराणा दुकानात बेकायदेशीरपणे दारूची विक्री केली जात असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण यांना मिळाली . त्यांनी उपनिरीक्षक धनावडे सह औटी , जाधव यांना बोलावून त्याची माहित देत कारवाईचे निर्देश दिले . पोलीस पथकाने गुरुवारी भवानी किराणा दुकानावर छापा मारला असता दुकानातील फ्रिज मध्ये देशी दारू व बियर चा साठा आढळून आला.

पोलिसांनी दारूचा सुमारे १८०० रुपयांचा साठा जप्त करून किराणा दुकानाचा मालक चौथाराम श्रीधन्नाराम चौधरी उर्फ छोटु मारवाडी (२८) रा . डी/22, जनता नगरररोड, हनुमान मंदिरा जवळ ह्याला ताब्यात घेऊन भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारवाडी हा किराणा दुकानाच्या आड दारूची जास्त दराने विक्री करत असे . ड्रायडेच्या दिवशी त्याचा धंदा आणखी जोरात असल्याचे काही नागरिकांनी सांगितले . किराणा दुकानातून गुटखा आदी विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत . पण चक्क दारूची विक्री केली जात असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे . पोलिसांनी झोपडपट्टी भागातील किराणा दुकानावर लक्ष केंद्रित केले आहे

Web Title: Sale of local liquor beer from a grocery store in Bhayander Shopkeeper arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.