दोन आदिवासी मुलींची विक्री
By admin | Published: August 11, 2014 03:19 AM2014-08-11T03:19:44+5:302014-08-11T03:19:44+5:30
दोन अल्पवयीन आदिवासी मुलींना ५० हजार रुपयांसाठी मध्य प्रदेशात विकणाऱ्या नराधम सावत्र बापासह येथील दोन महिला एजंट आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपींना शनिवारी पहाटे धारणी पोलिसांनी अटक केली
राजेश मालवीय ,धारणी (जि. अमरावती)
दोन अल्पवयीन आदिवासी मुलींना ५० हजार रुपयांसाठी मध्य प्रदेशात विकणाऱ्या नराधम सावत्र बापासह येथील दोन महिला एजंट आणि मध्य प्रदेशातील दोन आरोपींना शनिवारी पहाटे धारणी पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी यापूर्वीदेखील अनेक आदिवासी मुलींची विक्री केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रामप्रसाद खंजरु जांबेकर (४५) याला दोन सावत्र मुली आहेत. या दोन्ही मुलींचा तो सतत छळ करीत असे. धारणीतील महिला एजंट अर्चना असलम खान व कोमल भावसार यांच्यामार्फत त्याने मध्य प्रदेशातील अनिल जगदीश मालवीय, जगदीश साहेबलाल यादव यांच्याशी ५० हजारांत दोन्ही मुलींच्या विक्रीचा सौदा केला. मुलींच्या विक्रीचा सौदा करून टाकला. याची कुणकुण लागताच दोन्ही मुलींनी धारणी पोलीस ठाण्यात सावत्र बापासह महिला दलाल व मध्य प्रदेशातील खरेदीदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली. धारणी पोलिसांनी रामप्रसाद व महिला दलालांना अटक केली. त्यानंतर पोलिसांच्या चमूने मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील बराड येथून अनिल मालवीय, बोरखेडमधून जगदीश यादव या आरोपींना अटक केली.