सालेम, डोसाचा आज ‘निकाल’

By admin | Published: June 16, 2017 04:33 AM2017-06-16T04:33:54+5:302017-06-16T10:21:44+5:30

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल आज विशेष टाडा कोर्ट देण्याची शक्यता आहे. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या

Salem, Dosha Today 'Result' | सालेम, डोसाचा आज ‘निकाल’

सालेम, डोसाचा आज ‘निकाल’

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या खटल्याचा निकाल आज विशेष टाडा कोर्ट देण्याची शक्यता आहे. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह सात जणांचा यात समावेश आहे. या निकालाकडे मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण इतक्या मोठ्या बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई तेव्हा पहिल्यांदाच हादरली होती.

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील १३ मुख्य ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. त्या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर ७१३ लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. सुमारे २७ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पहिल्या खटल्याचा निकाल २००७ मध्ये लागला. १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवले तर २३४ जणांची पुराव्याअभावी सुटका केली. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर जुलै २०१५ मध्ये अंमल करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या केसमधील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला.

आणखी वाचा 
अबू सालेमला जन्मठेप
तुरूंगात अबू सालेमची बडदास्त... पार्टीसाठी चिकन, २४ तास मोबाइल

त्यानंतर अबू सालेम, मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज अब्दुल, रशीद खान, रियाझ सिद्दिकी, ताहीर मर्चंट आणि अब्दुल कय्यूम या सात जणांवर खटला चालवला. या सात जणांवरील खटला १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून चालवण्यात आला.

अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आले. मात्र आपणाला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्यापही फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे अद्यापही फरारी आहेत.

बॉलीवूड अभिनेता व १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरविल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर मुस्तफा डोसावर कट रचल्याचा व शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर ठेवण्यात आला आहे. तर अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप ताहीरवर आहे.

२०१३ मध्ये अबू सालेमवरील काही आरोप वगळण्यात आले. कारण सीबीआयने हे आरोप भारत व पोर्तुगालच्या प्रत्यार्पण करारात बसत नसल्याचे म्हणत विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. या संपूर्ण खटल्यात न्यायालयाने ७५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तर ५० बचावपक्षाच्या साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली. सालेमने त्याचा गुन्हा सीबीआय चौकशीत कबूल केला आहे. २००७ मध्ये या खटल्याला सुरुवात झाली होती. मात्र सालेम, डोसा आणि सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमुळे खटल्यास विलंब झाला. खटल्याला २०१२ मध्ये सुरुवात झाली आणि मार्च २०१७ मध्ये खटला संपला.

हा खटला सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकुब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. तसेच अन्य आरोपींच्या अपिलावरही निर्णय दिला.  त्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचाही समावेश आहे. संजय दत्तच्या शिक्षेत कपात करण्यात आली. मे २०१३ मध्ये संजय दत्तने विशेष टाडा कोर्टापुढे शरणागती पत्करली व त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. याकुबने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयालयात अनेक अर्ज केले. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री बसून त्याच्या अर्जावर निर्णय दिला आहे. अखेरीस ३० जुलै २०१५ रोजी त्याला फाशी देण्यात आली.

Web Title: Salem, Dosha Today 'Result'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.