सालेमचा निकाल १६ जूनला

By admin | Published: May 30, 2017 04:24 AM2017-05-30T04:24:58+5:302017-05-30T04:24:58+5:30

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा

Salem results on June 16 | सालेमचा निकाल १६ जूनला

सालेमचा निकाल १६ जूनला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल १६ जूनला देणार असल्याचे सोमवारी विशेष टाडा न्यायालयाने जाहीर केले. अबू सालेमसह मुस्तफा डोसा, अब्दुल कय्युम, शेख फिरोज खान, ताहीर मर्चंट, रियाझ सिद्दिकी आणि करीमुल्ला शेख यांच्याबाबत न्यायालय या दिवशी निकाल
देणार आहे.
१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावलेल्या शिक्षेनुसार त्याला जुलै २०१५ मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून या सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे.
अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आले. मात्र मला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्याप फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू असला
तरी अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
अभिनेता आणि १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर आहे. याच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्तफा डोसावर बॉम्बस्फोट करण्यासाठीचा कट रचल्याचा व त्यासाठी नियोजित स्थळी शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. तर ताहीरवर या प्रकरणातील अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप आहे.

गेली सहा वर्षे खटला सुरू

बॉम्बस्फोटप्रकरणी अबू सालेमला पोर्तुगालमधून तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आली. बॉम्बस्फोटाचा हा दुसरा खटला गेली सहा वर्षे सुरू आहे. पहिल्या खटल्यात १२९ जणांनी दिलेल्या कबुलीजबाबावर सरकारी वकील अवलंबून आहेत.
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत १२ बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटासाठी ३००० कि.ग्रॅ.पेक्षा अधिक आरडीएक्स देशात आणण्यात आले. त्यातील केवळ दहा टक्केच आरडीएक्स वापरण्यात आले. या बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला.

Web Title: Salem results on June 16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.