सालेमच्या शिक्षेची तारीख ठरणार २२ आॅगस्टला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:57 AM2017-08-11T04:57:26+5:302017-08-11T04:57:33+5:30

१९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील दुसºया खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा व अन्य चार जणांना दोषी ठरवले. याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. त्यामुळे निकालाची तारीख २२ आॅगस्ट रोजी निश्चित करण्यात येणार आहे.

 Salem's sentence will be fixed on August 22 | सालेमच्या शिक्षेची तारीख ठरणार २२ आॅगस्टला

सालेमच्या शिक्षेची तारीख ठरणार २२ आॅगस्टला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १९९३ साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील दुसºया खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने अबू सालेमसह मुस्तफा डोसा व अन्य चार जणांना दोषी ठरवले. तर एकाची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. दोषी ठरवलेल्यांना कोणती शिक्षा द्यावी, याबाबत विशेष वकील व बचावपक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद गुरुवारी पूर्ण झाला. त्यामुळे निकालाची तारीख २२ आॅगस्ट रोजी निश्चित करण्यात येणार आहे.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्याच्या ‘केस बी’चा १६ जून रोजी विशेष टाडा न्यायालयाने निकाल दिला. अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना विशेष न्यायालयाचे न्या. जी.ए. सानप यांनी दोषी ठरवले. तर रियाझ सिद्दिकीला टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवले, अब्दुल कय्युम याच्यावरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी वकील अपयशी ठरले, असे म्हणत न्या. सानप यांनी कय्युमची सुटका केली.
या सर्व दोषींना कोणती शिक्षा ठोठावायची याबाबत सीबीआय वकील व बचावपक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सीबीआयच्या वकिलांनी सालेम सोडून सर्वांना फाशी देण्याची विनंती केली. बचावपक्षाच्या वकिलांनी दोषींना दया दाखवण्यात यावी आणि कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. गुरुवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाने २२ आॅगस्ट रोजी निकालाची तारीख जाहीर करू, असे स्पष्ट केले.

Web Title:  Salem's sentence will be fixed on August 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.