अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणारा ड्रायव्हर सलीम मूळ जळगावचा

By admin | Published: July 11, 2017 05:27 PM2017-07-11T17:27:35+5:302017-07-11T17:30:06+5:30

अमरनाथ यात्रेला निघालेल्या १० रोजी रात्री ज्या बसवर हल्ला झाला ‘त्या’ बसचा चालक सलीम गफूर पटेल हा गुजरातमधील वलसाडचा रहिवाशी असला तरी

Salim root Jalgaon driver of life saving of many pilgrims | अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणारा ड्रायव्हर सलीम मूळ जळगावचा

अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणारा ड्रायव्हर सलीम मूळ जळगावचा

Next

ऑनलाइन लोकमत

पिंपरखेड (जि. जळगाव) : अमरनाथ यात्रेला निघालेल्या १० रोजी रात्री ज्या बसवर हल्ला झाला ‘त्या’ बसचा चालक सलीम गफूर पटेल हा गुजरातमधील वलसाडचा रहिवाशी असला तरी तो मुळचा जळगाव जिल्ह्यातील आहे. त्याने जिवाची पर्वा न करता बस भरधाव नेल्याने अनेकांचे प्राण वाचू शकले. 
अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात ७ भाविक ठार तर ३२ जखमी झाले. या बसचालकाचा भाऊ इकबाल याने ‘लोकमत’ शी दूरध्वानीवर बोलताना दिलेल्या माहितीनुसार ही थरारक घटना बस पंक्चर झाल्यामुळे घडली. ही बस सुरुवातीस सुरक्षा व्यवस्थेत इतर बसेस सोबत होती. मात्र बस पंक्चर झाल्यामुळे ही बस मागे राहिली बसचे पंक्चर टायर बदलल्यानंतर बस मार्गस्थ झाली असता रस्त्यात दोन मोटरसायकलस्वार बस जवळून गेले व ते बसला सुरक्षा व्यवस्था नसल्याचे पाहून माघारी परतले. हे सलीमच्या लक्षात आले व त्याने वेगाने बस पुढे नेली मात्र काही वेळातच अतिरेक्यांनी त्यांना गाठत बसवर गोळीबार केला.  अशा स्थितीतही सलीमने जिवाची पर्वा न करता बस पळवली. या दरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला मात्र सलीमच्या धाडसामुळे अनेकांचे प्राण वाचू शकले. त्याने घाबरुन जावून बस पळवली नसती तर आणखी अनेकांचे प्राण गेले असते. याबद्दल सलीमचे कौतुक होत आहे. यामुळे तो मंगळवारी सायंकाळी तो बलसाडला घरी परतल्यावर अनेकांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
बसचालक सलीम जळगाव जिल्ह्यातला-
सलीम (वय २७) हा मुळचा भडगाव तालुक्यातील पिंपरखेड (जळगाव जिल्हा) येथील रहिवासी आहे. सलीमचे वडील गफूर पटेल हे कामधंद्यानिमित्त कुटुंबासह सुमारे १५ वर्षापासून बलसाड (गुजरात) येथे स्थायिक झाले आहेत.  त्यांना बबलू इकबाल, सलीम, आशिक अशी चार मुले असून तीन मुले ड्रायव्हींगचे काम करतात तर आशिक हा सर्वात लहान टेलरींगचे काम करतो. सलीमचा विवाह झाला असून त्यास एक मुलगा व मुलगी आहे. पटेल कुटुंबियांची पिंपरखेड येथे थोडी शेती असल्याने कधीतरी त्यांचे त्यानिमित्ताने येथे येणे- जाणे होते.

Web Title: Salim root Jalgaon driver of life saving of many pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.