सलीम सरदार मुल्ला, सुशील शिंदे यांना साहित्य अकादमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 03:18 AM2019-06-15T03:18:47+5:302019-06-15T03:19:28+5:30
नवी दिल्ली : पुण्याच्या इंदापूरमधील सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहासाठी व कोल्हापूरच्या हातकणंगलेतील तळंदगे गावचे ...
Next
नवी दिल्ली : पुण्याच्या इंदापूरमधील सुशीलकुमार शिंदे यांना ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहासाठी व कोल्हापूरच्या हातकणंगलेतील तळंदगे गावचे सलीम सरदार मुल्ला यांना ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी अनुक्रमे युवा व बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. कोकणी भाषेत हेमंत अय्या यांना ‘कथाकार’ या लघुकथेसाठी युवा गटात, तर बाल गटात राजश्री बांदोडकर यांना ‘चिटकुल्या चिंकीचे विशाल विश्व’ या कथासंग्रहासाठी अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.