सलमान , धोनीकडून अनंत अंबानीवर कौतूकाची थाप
By admin | Published: April 11, 2016 05:04 PM2016-04-11T17:04:49+5:302016-04-11T17:04:49+5:30
अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटविल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेता सलमान खानसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही त्याचे कौतुक केले
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या वजनावर नियंत्रण ठेवणे अनेकांसाठी आव्हान बनले असताना उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने मात्र, अथक प्रयत्नाने १८ महिन्यांत १०८ किलो वजन घटविल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनेता सलमान खानसह भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनेही त्याचे कौतुक केले आहे.
आयपीएलच्या सुरवातीच्या सत्रांमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानींचा मुलगा अनंत हा आई नीतासोबत सीमारेषेवरील कोचावर बसलेला टीव्हीवर दिसत असे. विश्वास बसणार नाही असे तब्बल १०८ किलो वजन घटविण्यात अनंतला यश आले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या एका पार्टीत त्याचा हा खऱ्या अर्थाने शिडशिडीत बांधा दिसला अन् सोशल मीडियावर चर्चेला उधान आले. अनंत अंबानी हा विषय ट्विटरवर ट्रेंड झाला. सहा-सहा तास वर्कआऊट करून त्याने १०८ किलो वजन घटवले.
So happy to see Anant Ambani,lots of respect n sooo happy fr him.Takes a lot of willpower to loose 108kgs in 18mnths pic.twitter.com/Rfd6pgAeEn
— Salman Khan (@BeingSalmanKhan) April 10, 2016
धोनीने अनंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याने घटविलेले वजन हेच त्याला वाढदिवसाला मिळालेले मोठे गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. तर सलमानने अनंतला पाहून आनंद व्यक्त करत, त्याने इच्छाशक्तीच्या जोरावर 108 किलो वजन कमी केल्याचे म्हटले आहे.
Wish u a very happy birthday Anant.u gave the best gift to urself by losing over 100kg.discipline and determination pic.twitter.com/0BNEl0drlH
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) April 10, 2016
१८ महिन्यांत अनंतने त्याच्या दिनचर्येत कोणताही बदल केला नाही. तो रोज पाच ते सहा तास व्यायाम करायचा. त्यानंतर योगसाधना झाल्यावर २१ किमी चालायचा. आहारामध्ये साखरेचा शून्य समावेश होता. अल्प प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि त्या जोडीला आवश्यक ते फॅट्स आणि प्रोटीन्स यांचा समावेश करण्यात आला होता.
अनंतच्या वजन घटवण्याच्या प्रवासात मी नेहमीच त्याच्याबरोबर होते. त्याची इच्छाशक्ती, अथक प्रयत्न आणि चिकाटीचे दर्शन या काळात मला झाले. आम्ही त्याला सतत प्रोत्साहन देत होतोच. अनंतसाठी ही वाट खूपच खडतर होती, पण त्याने हे करून दाखवले. त्याचा हा १८ महिन्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. असे नीता अंबानी म्हणाल्या.