छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात सलमान खान

By admin | Published: July 17, 2016 08:40 AM2016-07-17T08:40:12+5:302016-07-17T08:43:45+5:30

बॉलिवूडचा सुल्तान सलमान खान लवकरच रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी' या सिनेमामध्ये दिसणार आहे.

Salman Khan in the film on Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात सलमान खान

छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटात सलमान खान

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १७ - बॉलिवूडचा सुल्तान सलमान खान लवकरच रितेश देशमुखच्या 'छत्रपती शिवाजी' या सिनेमामध्ये दिसणार आहे. अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवत असून, सलमान खानची या चित्रपटात महत्वाची भूमिका असू शकते. सुल्तानच्या यशानिमित्त आयोजित पत्रकारपरिषदेत स्वत: सलमानने ही माहिती दिली. 
 
मी 'छत्रपती शिवाजी' सिनेमामध्ये काम करत असून, माझे पाच ते सहा दिवसांचे काम आहे. रितेश देशमुख या चित्रपटाची निर्मिती करत असून, मला चांगली भूमिका मिळाली आहे असे सलमानने सांगितले.  रितेश आणि जेनेलिया मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 
 
टाइमपास नटरंग आणि बीपी या हिट मराठी सिनेमांचे दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सलमान खानचा हा पहिला मराठी सिनेमा नाही. यापूर्वी रितेश देशमुखच्याच 'लय भारी' चित्रपटात सलमानने छोटीशी भूमिका केली होती. 'छत्रपती शिवाजी' सिनेमात सलमानची नेमकी काय भूमिका आहे ते अद्याप गुलदस्त्यात आहे. 
 

Web Title: Salman Khan in the film on Chhatrapati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.