सलमानच्या खटल्याला २४ तारखेचा मुहूर्त

By admin | Published: September 13, 2014 04:40 AM2014-09-13T04:40:17+5:302014-09-13T04:40:17+5:30

अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचे कामकाज २४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे.

Salman Khan's 24-day trial | सलमानच्या खटल्याला २४ तारखेचा मुहूर्त

सलमानच्या खटल्याला २४ तारखेचा मुहूर्त

Next

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन खटल्याचे कामकाज २४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. या खटल्यातील साक्षीदारांचे जबाब व काही कागदपत्रे गहाळ झाल्याचे जून महिन्यात वांद्रे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते़
त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थांबलेल्या या खटल्याचे कामकाज थांबले होते़ मात्र सर्व ६३ साक्षीदारांपैकी ६२ साक्षीदारांच्या जबाबाची मूळ प्रत व इतर कागदपत्रे सापडली असून उर्वरित एका साक्षीदाराच्या जबाबाची प्रतही लवकरच सादर केली जाईल, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांना दिली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने या खटल्याचे कामकाज २४ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले़ त्यादिवशी सलमानही न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे़ १२ वर्षांपूर्वी सलमानने वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत चौघांना चिरडले़ त्यातील एकाचा बळी गेला़ याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा आरोप ठेवण्यात आला आहे़ यात दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते़ (प्रतिनिधी)

Web Title: Salman Khan's 24-day trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.