सलमान खटला : साक्षीदाराने केले घूमजाव

By admin | Published: June 25, 2014 01:56 AM2014-06-25T01:56:39+5:302014-06-25T01:56:39+5:30

अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े

Salman Khan's case: The witness has been arrested | सलमान खटला : साक्षीदाराने केले घूमजाव

सलमान खटला : साक्षीदाराने केले घूमजाव

Next
>मुंबई : अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेल्या हिट अॅण्ड रन खटल्यात मंगळवारी एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबाला घूमजाव केल़े तर या अपघातात जखमी झालेल्या एका साक्षीदाराने सलमानला न्यायालयात ओळखल़े सचिन कदम असे घूमजाव झालेल्या साक्षीदाराचे नाव आह़े कदम हे अपघात झालेल्या ठिकाणी जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करतात़ घटनेच्या दिवशी ते तेथे कार्यरत होत़े  सत्र न्यायाधीश डी़ डब्ल्यू़ देशपांडे यांच्यासमोर त्यांची साक्ष नोंदवली़ त्यात ते म्हणाले, अपघात झाला त्या वेळी मी सलमानला चालकाच्या सीटच्या दिशेने गाडीतून उतरताना व तेथून पळून जाताना पाहिले असल्याचे पोलिसांचे म्हणणो चुकीचे आह़े  त्यामुळे पोलिसांनी असा जबाब का नोंदवला हे मला माहिती नाही़   (प्रतिनिधी)
 
2002
साली झालेल्या अपघातप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू असून, बुधवारी सुनावणी होणार आह़े 
 
या अपघातात जखमी झालेले मोहम्मद शेख यांनी साक्ष देताना सलमानला न्यायालयात ओळखल़े ते म्हणाले, हा अपघात होण्याआधी मी व नरूल्ला पदपथावर झोपलो होतो़ त्या वेळी एक मोठी गाडी आमच्यावर आदळली व आम्ही गाडीखाली गेलो़ यानंतर तेथे जमलेल्या जमावाने मला गाडीखालून काढल़े तेव्हा सलमान तेथे उभा होता़ 

Web Title: Salman Khan's case: The witness has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.