सलमान लवकरच घेणार इमानची भेट

By admin | Published: February 16, 2017 05:14 AM2017-02-16T05:14:52+5:302017-02-16T05:14:52+5:30

बेरिएट्रिक सर्जरी अर्थात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून मुंबईत दाखल झालेली ३६ वर्षीय इमान अहमद ही बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याची चाहती

Salman will soon take a begging visit | सलमान लवकरच घेणार इमानची भेट

सलमान लवकरच घेणार इमानची भेट

Next

मुंबई : बेरिएट्रिक सर्जरी अर्थात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून मुंबईत दाखल झालेली ३६ वर्षीय इमान अहमद ही बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याची चाहती आहे. इमानची शस्त्रक्रिया करणारे डॉ. मुफ्फजल लकडावाला हे खान कुटुंबीयांचेही डॉक्टर असल्याने तिची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून सलमान लवकरच इमानची भेट घेईल.
बेरिएट्रिक सर्जरी होण्यापूर्वी चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात उपचार घेत असलेली इमान सलमानच्या किक, दबंग, सुलतान यासारख्या चित्रपटांतील गाणी टीव्हीवर पाहत आहे. चाहत्यांच्या भेटीगाठीच्या इच्छा सलमान सहसा टाळत नाही. कुठलीही अधिकृत विचारणा झाली, तर आम्ही त्याबाबत विचार करू, असे सलमानचे पिता सलीम खान यांनी सांगितले आहे. सलमान अशाप्रकारे अनेक रुग्णांची भेट घेतो, त्यामुळे विनंती नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचेही सलीम खान यांनी सांगितले. तर खान कुटुंबीयांचे डॉक्टर असणारे मुफ्फजल लकडावाला यांनी याविषयी सांगितले की, लवकरच रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीनंतर सलमान खानला अधिकृतरीत्या इमानच्या भेटीबद्दल विचारले जाईल, त्याने होकार कळविल्यास ही भेट निश्चितच होईल.
इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर जवळपास सहा महिने इमानला भारतात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे. सैफी रुग्णालयात इमानसाठी उभारण्यात आलेल्या ‘वन बेड हॉस्पिटल’साठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या विशेष रुग्णालयाचा दरवाजा सात फुटांचा आहे, शिवाय बेडसुद्धा इमानच्या वजनाच्या अनुसार उपलब्ध करून दिला आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये एक आॅपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी एक रूम, दोन विश्रामगृहे, देखभाल करणाऱ्या डॉक्टरांचा कक्ष आणि एक व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंग रूम अशी रचना आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Salman will soon take a begging visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.