शहीद जवानांना नगरमध्ये अभिवादन
By admin | Published: December 17, 2015 01:48 AM2015-12-17T01:48:47+5:302015-12-17T01:48:47+5:30
सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ४४ व्या विजय दिवसानिमित्त युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.
अहमदनगर : सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या ४४ व्या विजय दिवसानिमित्त युद्धातील शहिदांना येथील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले. ‘एसीसी अँड एस’चे मेजर जनरल प्रवीण दीक्षित यांच्यासह सेवानिवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी शहिदांना वंदन केले.
१९७१ च्या युद्धात ‘एसीसी अँड एस’चे मोठे योगदान आहे. युद्धात एसीसीएसचे सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनाखाली सैनिकांनी पश्चिम व पूर्व दिशेने कूच केले होते. सैनिकांचे मनोधैर्य वाढवत, त्यांनी शत्रूशी निडरपणे मुकाबला केला. त्यात त्यांना बलिदान द्यावे लागले. या साहसाबद्दल त्यांना परमवीर चक्राने गौरविण्यात आले. या शिवाय १५ महावीर चक्र, ६० वीरचक्र यांसह अनेक शौर्यपदक एसीसी अँड एसच्या जवानांना देण्यात आले. (प्रतिनिधी)