५९ पोलिसांच्या शौर्याला सलाम! चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 05:38 AM2024-08-15T05:38:25+5:302024-08-15T05:40:02+5:30

दत्तात्रय शिंदे, संदीप दिवाण यांना पोलिस पदक

Salute to the bravery of 59 policemen President Medal to three including Chiranjeev Prasad | ५९ पोलिसांच्या शौर्याला सलाम! चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

५९ पोलिसांच्या शौर्याला सलाम! चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील ९०८ पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील ५९ पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ तर, मीरा-भाईंदर, वसई-विरारचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, ‘एसीबी’चे उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांच्यासह ३९ जणांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ व आयपीएस अधिकारी अनुज तारे यांच्यासह १७ पोलिसांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.

चिरंजीव प्रसाद यांच्यासह आयपीएस अधिकारी राजेंद्र डहाळे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. २५ जुलै २०२२ रोजी दोन कुख्यात मंगळसूत्र चोर आणि शस्त्रास्त्र तस्करांना पकडण्यात दुर्मीळ शौर्य दाखविल्याबद्दल तेलंगणा पोलिस हेड कॉन्स्टेबल चडुवू यदाय्या यांना शौर्याचा सर्वोच्च पोलिस सन्मान असलेले एकमेव पीएमजी पदक जाहीर करण्यात आले आहे. दोन गुन्हेगारांनी पोलिसावर हल्ला केला होता आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर चाकूने अनेक वार केले; परंतु त्यांनी त्यांना आपल्या पकडीतून सोडले नाही. नंतर त्यांच्यावर १७ दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अशोक बोवाजी ओलंबा (हवालदार) गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) नितीन भालचंद्र वयचल (प्राचार्य), शिवाजी पांडुरंग जाधव (जेलर ग्रुप-१), दीपक सूर्याजी सावंत (सुभेदार) आणि जनार्दन गोविंद वाघ (हवालदार) नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेचे नेतृत्व करताना कारवाईत शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्तिचक्र हा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुरक्षा दलातील इतर तीन जवान रायफलमॅन रवी कुमार (मरणोत्तर), मेजर मल्ल रामा गोपाल नायडू, जम्मू आणि काश्मीर पोलिस उपअधीक्षक हिमायून मुज्जम्मील भट (मरणोत्तर) यांनाही कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय रायफल्सचे सेकंड-इन-कमांड म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांना सेनापदक मिळाले होते. भट हेही याच मोहिमेत शहीद झाले होते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना एकूण १०३ शौर्य पुरस्कार मंजूर केले. त्यात चार कीर्तिचक्राव्य- तिरिक्त १८ शौर्य चक्र (चार मरणोत्तर), एक बार टू सेनापदक, ६३ सेनापदके, ११ नवसेनापदके आणि सहा वायुसेना पदकांचा समावेश आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना पदक

  • कर्नल सिंग हे लढाऊ होते आणि १९ राष्ट्रीय रायफल्सचे सेकंड-इन-कमांड म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांना सेनापदक मिळाले होते. भट हेही याच मोहिमेत शहीद झाले होते.
  • स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना एकूण १०३ शौर्य पुरस्कार मंजूर केले. त्यात चार कीर्तिचक्राव्य- तिरिक्त १८ शौर्य चक्र (चार मरणोत्तर), एक बार टू सेनापदक, ६३ सेनापदके, ११ नवसेनापदके आणि सहा वायुसेना पदकांचा समावेश आहे.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी १६ रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (आरपीएसएफ) कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी पदक प्रदान केले. दक्षिण रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त जीएम ईश्वरा राव यांना विशिष्ट सेवेसाठी (पीएसएम) राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे उपनिरीक्षक संजय वसंत मोरे यांच्यासह १५ अधिकाऱ्यांना गुणवंत सेवेसाठी पोलिस पदक मिळाले आहे.


गुणवत्तापूर्ण सेवेसाठी यांचा सन्मान

पोलिस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, विनीत चौधरी, महेश तराडे, पोलिस अधीक्षक संजय खांडे, सहायक पोलिस आयुक्त विजय हातिसकर, पोलिस निरीक्षक सदानंद राणे, राजेश भागवत, अशोक होनमाने, रामदास पालशेतकर, राजू सुर्वे, संजीव धुमाळ, सहायक उपनिरीक्षक सुनील हांडे, दत्तू खुळे, देवीदास वाघ, प्रकाश वाघमारे, संजय पाटील, मोनिका थॉमस, अनिल काळे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, गजानन तेंडुलकर, राजेंद्र पाटील, संजय राणे, गोविंद शेवाळे, मधुकर नैतम, प्रकाश देशमुख, शशिकांत तटकरे, ए. जे. शुक्ला, शिवाजी जुंदारे, प्रकाश देशमुख, मोहन निखारे, द्वारकादास भांगे, अमितकुमार पांडे, पोलिस अंमलदार बंडू ठाकरे, गणेश भामरे, अरुण खैरे, दीपक तैलू, राजेश पैडलवार आणि सहायक कमांडंट श्रीकृष्ण हिरपूरकर.

केंद्रीय, राज्य दलांसाठी १,०३७ पोलिस पदके

  • सरकारने बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध केंद्रीय आणि राज्य दलातील १,०३७ पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली. २४१ जवानांना शौर्य पदकांनी सन्मानित केले जाईल.
  • केंद्रीय राखीव पोलिस दलाला सर्वाधिक ५२ शौर्य पदके, जम्मू-काश्मीर पोलिसांना ३१, उत्तर प्रदेशातील १७ पोलिस कर्मचारी, छत्तीसगडमधील १५ आणि मध्य प्रदेशातील डझनभर शौर्य पदके देण्यात आली आहेत.


चकमकीत दाखवले शौर्य

सन २०१७ मध्ये मौजा कापेवंचा-कवठाराम, सन २०१९ मध्ये मोरमेट्टा व सन २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलिस-माओवादी चकमकीत एकूण चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले होते. या चकमकीत केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन १७ जणांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर झाले.

शौर्य पदकाचे मानकरी

नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आयपीएस अनुज तारे यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक दीपक औटे, शहीद धनाजी होनमाने, राहुल देव्हडे, विजय सपकाळ आणि पोलिस अंमलदार नागेशकुमार मादरबोईना, शकील शेख, विश्वनाथ पेंदाम, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, कैलास कुळमेथे, कोतला कोरामी, कोरके वेलादी, महादेव वानखेडे, महेश मिच्चा, समय्या आसम यांचा समावेश आहे.   

महाराष्ट्रातील सहा जणांना ‘अग्निशमन सेवा पदक’

  • स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत.
  • यामध्ये राज्यातीतील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • कर्नल मनप्रीत सिंग यांच्यासह इतर तिघांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर.
  • १६ रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (आरपीएसएफ) कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक 


स्वातंत्र्याच्या उत्सवातील सर्व नागरिक हे आमचे कुटुंब: राष्ट्रपती

नवी दिल्ली: स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होणारे देशातील सर्व नागरिक हे आमचे कुटुंब आहे असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. त्या म्हणाल्या की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनुसूचित जाती-जमाती व अन्य उपेक्षित समुदायांच्या कल्याणासाठी पावले उचलली आहेत. देशातील उपेक्षित समुदायांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण योजना राबविली आहे. 

माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. भारतीय पोलिस सेवेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. ज्या उद्दिष्टासाठी या सेवेमध्ये आलो ते म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे; तसेच पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत राहते.
- दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पोलिस आयुक्तालय

Web Title: Salute to the bravery of 59 policemen President Medal to three including Chiranjeev Prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.