तुमच्या शाैर्याला सॅल्यूट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा जखमी जवानाला फोन, गडचिरोली पोलिसांचे तोंडभरून काैतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 09:56 AM2021-03-06T09:56:57+5:302021-03-06T09:58:40+5:30

Chief Minister Thackeray's phone call to the injured soldier : महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेल्या दुर्गम मुरुमभूशी जंगलात गुरुवारपासून पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली होती.

Salute to your poetry, Chief Minister Thackeray's phone call to the injured soldier | तुमच्या शाैर्याला सॅल्यूट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा जखमी जवानाला फोन, गडचिरोली पोलिसांचे तोंडभरून काैतुक

तुमच्या शाैर्याला सॅल्यूट, मुख्यमंत्री ठाकरे यांचा जखमी जवानाला फोन, गडचिरोली पोलिसांचे तोंडभरून काैतुक

googlenewsNext

- नरेश डोंगरे
नागपूर - शाैर्याची अत्युल्य परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्राला तुमच्या धाडसाचा अभिमान आहे. तुम्ही बजावलेली कामगिरी अतुलनीय असून तुमचे काैतूक करावे तेवढे थोडेच आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सरकार आणि जनतेच्यावतीने तुमच्या शाैर्याला सॅल्यूट करतो,अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी नक्षल्यांच्या गुहेत शिरुन त्यांच्या गोळीबाराचा सामना करणाऱ्या सी-६० चे जवान मोहन उसेंडी (वय २७) यांचे शुक्रवारी मध्यरात्री काैतूक केले. (Salute to your poetry, Chief Minister Thackeray's phone call to the injured soldier )

महाराष्ट्र - छत्तीसगड राज्याच्या सिमेवर असलेल्या दुर्गम मुरुमभूशी जंगलात गुरुवारपासून पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू होती. विशेष म्हणजे, हा भाग नक्षलवाद्यांची गुहा समजल्या जाणाऱ्या अबुझमाड लगतच आहे. त्या भागात १२ ही महिने मोठ्या संख्येत नक्षल्यांचा जमावडा असतो. त्यांचे प्रशिक्षणस्थळ तसेच शस्त्र, बॉम्ब बनविण्याचे कारखाने आणि ते साठविण्याचेही अड्डे याच भागात आहे. त्या भागात सलग १६ ते १८ तास नक्षल्यांच्या बेछुट गोळीबाराला प्रत्युत्तर देत पोलिसांनी नक्षल्यांचा कारखाना उध्वस्त केला. एवढेच नव्हे तर त्यांना पळून जाण्यासही भाग पाडले.

या चकमकीदरम्यान स्वताच्या पायावर गोळी झेलणारा जखमी जवान मोहन उसेंडी यांना शुक्रवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील रात्री इस्पितळात पोहचले. ते डॉक्टरांशी चर्चा करीत असतानाच मध्यरात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा त्यांना फोन आला. पाटील यांच्याकडून जखमी जवानांची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उसेंडी यांच्यासोबत संवाद साधला. ‘महाराष्ट्राची शाैर्याची परंपरा अत्युल्य आहे. तुम्ही बजावलेली कामगिरीदेखील अतुलनीय असून तुमच्या धाडसाचे काैतूक करावे तेवढे थोडेच आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सरकार आणि जनतेच्या वतिने तुमच्या शाैर्याला सॅल्यूट करतो. तुम्ही काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा,’ असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जखमी जवानाचे काैतूक केले.

थँक्यू सर , जय हिंद।
काैतूकाच्या या शब्दांनी जखमी जवान उसेंडी यांचे मनोबल कमालीचे उंचावले. जोषाचा बुस्टर मिळाल्यासारखे त्यांनी ‘थँक्यू सर , जय हिंद’ सर म्हणत मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

Web Title: Salute to your poetry, Chief Minister Thackeray's phone call to the injured soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.