“मोदी तेरे राज मे, कटोरा आया हाथ मे”; समाजवादी पक्षाचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 06:37 PM2021-06-17T18:37:20+5:302021-06-17T18:40:51+5:30

केंद्र शासनाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

samajwadi party protest against centre govt on various issues at bhiwandi | “मोदी तेरे राज मे, कटोरा आया हाथ मे”; समाजवादी पक्षाचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

“मोदी तेरे राज मे, कटोरा आया हाथ मे”; समाजवादी पक्षाचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन

googlenewsNext

नितिन पंडीत 

भिवंडी: सध्या देशभर कोरोना संकट असतांनाही केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल, डिझेलच्या इंधन दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असल्याने देशभर प्रचंड महागाई वाढली असल्याने, केंद्र शासनाच्या विरोधात समाजवादी पक्षाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. समाजवादी पक्षाचे नेते तथा प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांच्या सूचनेनुसार भिवंडी पूर्वचे समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी हे आंदोलन पार पडले.  यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. " मोदी तेरे राज मे , कटोरा आया हाथ मे"अशा घोषणा देत केंद्रातील भाजप सरकारच्या सबका साथ सबका विकास या घोष वाक्याचा खरपूस समाचार घेत केंद्र सरकार विरोधात घोषणा करत केंद्र शासनाच्या इंधन दर वाढीचा व महागाई वाढीचा जाहीर निषेध केला.

भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या समाजवादी पक्ष कार्यालयापासून दुपारी तीन नंतर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाचा निषेध नोंदवत आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार रईस शेख यांनी भिवंडी प्रांत अधिकारी डॉ मोहन नळदकर यांच्याकडे सुपूर्द केले. दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली असतांना देखील समाजवादीच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात समाजवादी कार्यालय ते प्रांत कार्यालय असा पायी आंदोलन केले.

मोदी सरकारने देशातील जनतेच्या माथी मारलेली इंधन दरवाढ व महागाई कमी केली नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया समाजवादीचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
 

Web Title: samajwadi party protest against centre govt on various issues at bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.