Sangli Band : संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 09:56 AM2020-01-17T09:56:14+5:302020-01-17T09:57:34+5:30
Sangli Band : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शहारात आज सकाळपासून दुकाने बंद आहेत. तसेच, सांगली बंद आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावरून सध्या राज्यात वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊतांनी उदयनराजे यांच्याबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील, असे संभाजी भिडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या बुधवारी ‘लोकमत’च्या वतीने पुण्यात आयोजित 'लोकमत पत्रकारिता पुरस्कार' सोहळ्यात संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली होती. यावेळी संजय राऊत यांनी उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदरच करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतमस्तकच होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असे आव्हान संजय राऊत यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले होते. तसेच शरद पवार यांना जाणता राजा ही उपाधी जनतेने दिली आहे. रक्षणकर्ता राजा असतो, लुटणारा राजा नसतो, असाही चिमटा त्यांनी काढला होता.
आणखी बातम्या..
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य, तर ३६ मंत्री तिकडे का पाठवता?