Sambhaji Bhide: "विषबाधा, भूतबाधेवर उपाय, पण…", संभाजी भिडेंच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 12:57 PM2022-04-27T12:57:26+5:302022-04-27T12:57:36+5:30

Sambhaji Bhide: ''123 कोटी लोकांचा रक्तगट बदलून शिवाजी-संभाजी करायला हवा.''

Sambhaji Bhide Statement on India and Chtarpati Shivaji Maharaj | Sambhaji Bhide: "विषबाधा, भूतबाधेवर उपाय, पण…", संभाजी भिडेंच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Sambhaji Bhide: "विषबाधा, भूतबाधेवर उपाय, पण…", संभाजी भिडेंच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार?

googlenewsNext

सांगली: सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे अजून एक विधान आता चर्चेत आले आहे. ''भारताला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. एकवेळ विषबाधा आणि भूतबादेवर उपाय मिळेल, पण.." असे वक्तव्य भिडेंनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या सुशोभिकरण लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

'हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या'
यावेळी बोलताना ते म्हणाले की, "व्यक्तीच्या जीवनात भूतबाधा होते, काही खाण्या-पिण्यातून विषबाधा होते. या बाधांवर उपाय आहेत, पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. या तीन बाधांवर तोडगा कोणता असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज," असे भिडे म्हणाले.

'123 कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल'
ते पुढे म्हणाले की, "सबंध जगाचा त्राता म्हणून हिंदुस्थानला ताकद मिळाली पाहिजे. ती मिळायची असेल, तर एकच उपाय आहे. सबंध हिंदुस्थानचा रक्तगट बदलायला हवा. 123 कोटी लोकांचा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. तो करण्याचा उद्योग शिवछत्रपतींच्या जीवनाच्या उपासनेतून होऊ शकतो. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठी माझा जन्म आहे असं भगवंताला रोज सकाळी आपण म्हटलं पाहिजे", असंही भिडे यावेळी म्हणाले.

'छत्रपतींनी देशाचा विचार केला'
ते पुढे म्हणातात की, "शिवाजी महाराजांना काय प्रिय होतं? मरणाच्या वेळीदेखील हा महापुरुष आपले कुटुंब, लेकीबाळी, सुना-नातवंड यांचा विचार करत नव्हता. 3 एप्रिल 1680 रोजी दुपारी 12 वाजून 3 मिनिटांनी शिवछत्रपतींनी देहत्याग केला. त्यापूर्वी आपल्या भोवतीच्या माणसांना ते म्हणाले 'आम्ही जातो, आमचा इथला मुक्काम संपला. सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा.' सप्तसिंधू म्हणजे काय? हिमालयात उगम पावणाऱ्या गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, नर्मदा, गोदावरी, कावेरी अशा सात नद्या", असंही संभाजी भिडे म्हणाले.

Web Title: Sambhaji Bhide Statement on India and Chtarpati Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.