‘मनुस्मृती’च्या विक्रीस संभाजी ब्रिगेडचा विरोध
By admin | Published: March 13, 2016 01:53 AM2016-03-13T01:53:07+5:302016-03-13T01:53:07+5:30
संविधान हाच भारतीय जनतेचा पवित्र धर्मग्रंथ असल्याचे नोंदवले मत.
अकोला : फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांची अधोगती करणारी ह्यमनुस्मृतीह्ण पुन्हा प्रकाशित करून, विक्री करण्याचा घाट काही प्रतिगामी प्रवृत्ती रचत आहेत; मात्र महाराष्ट्रात कोणत्याही कोपर्यात मनुस्मृतीची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा बहुजनघातक ग्रंथाची होळी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. अकोला जिल्हाध्यक्ष पंकज जायले यांनी शुक्रवारी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. भारतीय संविधानाशिवाय संभाजी ब्रिगेड कोणत्याही ग्रंथाला मानत नाही, संविधान हाच भारतीय जनतेचा पवित्र धर्मग्रंथ होय. प्रतिगामी प्रवृत्ती परत मनुस्मृती व्यवस्था बहुजनांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत असेल तर, संभाजी ब्रिगेड त्याविरुद्ध संघर्षसाठी सज्ज असल्याचा इशाराही पंकज जायले यांनी म्हटले आहे.