संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:04 AM2018-12-01T06:04:33+5:302018-12-01T06:04:50+5:30

लोकसभेच्या ३०, तर विधानसभेच्या १०० जागा लढविणार

Sambhaji Brigade will come in the election fray | संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

संभाजी ब्रिगेड उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

googlenewsNext

मुंबई : औरंगाबादमध्ये ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळाव्याची हाक देत, संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक कपिल डोके यांनी ही माहिती दिली.


डोके म्हणाले की, सत्ताधारी किंवा विरोधकांना शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. मेलेल्या वाघिणीच्या विषयावर राजकारण होते. मात्र, स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाऱ्या शेतकºयांवर चर्चा करण्यासाठी प्रस्थापित पक्षांकडे वेळ नाही. तरुणांच्या रोजगाराऐवजी शहरांची नावे बदलण्यात सरकार व्यस्त आहे. म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात जनतेसाठी संभाजी ब्रिगेड हा सक्षम पर्याय असल्याचा दावा ढोके यांनी केला आहे.


लोकसभेच्या ३० जागा आणि विधानसभेच्या १०० जागा लढणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले, तसेच आगामी निवडणुकीचे बिगुल वाजवण्ययासाठी ९ डिसेंबरला स्वराज्य संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.


आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात निवडणुकीचा अजेंडा व पुढील वाटचालीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे, ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष दिनेश महाडिक यांनी स्पष्ट केले.


महाडिक म्हणाले की, बºयाच मतदार संघात आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. सोबतच समविचारी पक्षांशिवाय कोणत्याही प्रस्थापित पक्षासोबत जाणार नसल्याचेही त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना स्पष्ट केले.

‘दंगली पेटवू नका!’
निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा उकरून काढत, शिवसेनेकडून हिंदू-मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका ब्रिगेडने केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना धनगर आणि मुस्लीम आरक्षण प्रलंबित ठेवत सरकार जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. अशाप्रकारे देशात दंगली पेटवून भावनिक मुद्द्यांवर मते लाटण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही ब्रिगेडने केले आहे.

Web Title: Sambhaji Brigade will come in the election fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.