Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 04:56 PM2023-03-22T16:56:37+5:302023-03-22T17:01:20+5:30

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

sambhaji raje chhatrapati reaction on unseasonal rain and farmers facing major losses | Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

Maharashtra Politics: “अन्य राज्ये शेतकऱ्याला २४ तास वीज देतात, मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही?”; संभाजीराजेंचा सवाल

googlenewsNext

Maharashtra Politics: अलीकडे अवकाळी पावसाच्या जोरदार सरी राज्यातील अनेक भागात कोसळत आहेत. मंगळवारी मुंबई, उपनगरासह नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, काजूसह अन्य पिकांवरही अवकाळी पावसाचा परिणाम झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाल्याचे सांगितले जात आहे. यावरूनच संभाजीराजे छत्रपती यांनी शिंदे-फडणवीस सरकारला थेट सवाल केले आहेत. 

अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. यातच शेतकऱ्याला २४ तास बाकीची राज्ये वीज देतात. मग महाराष्ट्र का देऊ शकत नाही? असा प्रश्न संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. ते मीडियाशी बोलत होते. 

शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार?

अवकाळी पावसाचं संकट आहे तेव्हा कृषीमंत्री हेलिकॉप्टरने का फिरत नाही? अवकाळी पाऊस आला म्हणून हे जाहीर करतो. दुष्काळ पडला ही मदत देतो हे धोरण मागची २५ वर्षे सुरू आहे. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार? अशी विचारणाही संभाजीराजे यांनी केली आहे. तसेच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेतकऱ्यांना त्यांनी विविध योजना दिल्या आहेत. २४ तास वीज देत आहेत. ते समजून घेतले आणि त्याचसाठी त्यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांसाठी एक ठोस धोरण सरकारने हाती घेणे खूप आवश्यक आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे

स्वराज्य संघटना राजकारणात उतरवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे सुराज्य अपेक्षित होते तसे सुराज्य आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

दरम्यान, माझी सरकारला विनंती आहे की, आपला शेतकरी हा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे. त्याला मदत करायला हवी. शेतकरी जगला तर आपण जगू हे विसरून चालणार नाही. उद्या दुष्काळ पडू शकतो अशीही चर्चा आहे. अशात शेतकऱ्यांसाठी एक दीर्घकालीन योजना आणली पाहिजे. सरकारने अशी योजना आणली तरच शेतकरी जगू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन धोरण सरकारने आखावे, असे संभाजीराजेंनी यावेळी बोलताना सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: sambhaji raje chhatrapati reaction on unseasonal rain and farmers facing major losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.