Maharashtra Politics: “राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 05:56 PM2022-12-04T17:56:32+5:302022-12-04T17:57:47+5:30

Maharashtra News: भाजपची दुटप्पी भूमिका असून, राज्यपालांविरोधात रस्त्यावर का उतरत नाहीत, अशी विचारणा संभाजीराजेंनी केली आहे.

sambhajiraje chhatrapati again criticised bjp shinde govt over bhagat singh koshyari over comment on chhatrapati shivaji maharaj | Maharashtra Politics: “राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा

Maharashtra Politics: “राज्यपालांची हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत...”; संभाजीराजे संतापले, पुन्हा थेट इशारा

googlenewsNext

Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद यांसह अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. यातच संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली असून, थेट इशारा दिला आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढा अशी भूमिका सर्वांत अगोदर मी घेतली आहे. आम्ही वेळोवेळी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलेले आहे. ३० जिल्ह्यांत आम्ही आंदोलन केले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कोश्यारींना हटवण्याचे निवेदन दिले आहे. जेव्हा कोश्यारी पुण्यात आले, तेव्हा त्यांना काळे झेंडे स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनीच दाखवलेले आहेत. जोपर्यंत कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवू. भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा थेट इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

भाजपची दुटप्पी भूमिका, ते रस्त्यावर का उतरत नाहीत?

भाजप एकीकडे शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, असे म्हणतो. आम्ही राजकारण आणि समाजकारण शिवाजी महाराजांचे नाव घेऊनच करतो, असा दावा भाजप करतो. मग राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अद्याप महाराष्ट्रात कसे आहेत. भाजपची ही दुटप्पी भूमिका आहे. भाजप रस्त्यावर का उतरत नाही, अशी विचारणा करत, राज्यपालांनी जे विधान केले आहे, त्याची सर्व माहिती आम्ही योग्य ठिकाणी पोहोचवली, असे देवेंद्र फडणवीस सांगतात. हे काय उत्तर आहे का. त्यांची काही जबाबदारी नाही का? सरकारमध्ये असले म्हणजे बोलायचे नाही का? कोश्यारी यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. 

दरम्यान, राज्यपाल वेळोवेळी अपशब्द काढतात. यावर भाजपचे सरकार कशे शांत राहू शकते. कोश्यारी यांना महाराष्ट्रातून काढल्यानंतरच भाजपचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम निश्चित होणार आहे. राज्यपालांविषयी उदयनराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे वेगळे नाहीत. आम्ही आंदोलनं वेगळ्या पद्धतीने करत आहोत. मात्र आम्ही दोघे एकच आहोत, असे संभाजीराजे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: sambhajiraje chhatrapati again criticised bjp shinde govt over bhagat singh koshyari over comment on chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.