"विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार"; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:07 PM2022-08-14T14:07:45+5:302022-08-14T14:10:19+5:30

Sambhajiraje Chhatrapati And Vinayak Mete : "विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे"

Sambhajiraje Chhatrapati reaction over Vinayak Mete Accident | "विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार"; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

"विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार"; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये त्यांचे निधन झाले आहे. मेटेंच्या निधनानंतर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. "विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे" असं म्हटलं आहे. तसेच "मेटे यांच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे" असंही म्हटलं आहे. 

"विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे. ही पोकळी कशी भरून निघेल याचे उत्तर आमच्याकडे नाही. बीडसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीतून ते आले. गरीब मराठा समाजाला झळ बसू नये यासाठी त्यांचा लढा सुरू होता. विनायक मेटे यांनी मराठा समजाची बाजू प्रभावीपणे मांडली. मोठे बंधू म्हणून ते मला नेहमी सल्ला द्यायचे. सरकारवर दबाव टाकायचा असेल तर आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते नेहमी सांगायचे" असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. 

"मेटे यांना मी श्रद्धांजली वाहतो. सरकारने जी चौकशी करायची आहे ती करावी. विनायक मेटे यांच्या मृत्यूला केंद्र तसेच राज्य सरकार जबाबदार आहे. अपघात झाल्यानंतर मेटे यांना एक तास उशिराने आपत्कालीन मदत मिळाली. सरकारकडे आपत्कालीन सुविधा पुरवण्याची काय नियमावली आहे? मुंबई-पुणे या मार्गावर रहदारी असते. येथे आपत्कालीन मदत पोहोचविणाऱ्या दोन ते तीन गाड्या असायला हव्यात. अशी अचानक घटना घडली तर मदत पोहोचावी म्हणून केंद्र तसेच राज्य सरकारने योग्य ती तरतूद करायला हवी" असं देखील संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे.

"...तर विनायक मेटे वाचू शकले असते, त्यांचं निधन मनाला चटका लावणारं"

"विनायक मेटेंचं अपघाती निधन हे मनाला चटका लावणारं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे ते नेते होते. मराठा तरुणांच्या मनावर ठसा उमटवणारे लाडके नेते होते. आरक्षणाच्या बैठकीसाठी येत असताना अपघाती निधन झालं. ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते. महायुतीचे ते लोकप्रिय नेते होते. अपघात झाल्यानंतर त्यांना लवकर रुग्णवाहिका मिळाली नाही. मदत वेळेत मिळाली असती, रुग्णालयात लवकर पोहोचले असते तर ते वाचू शकले असते" अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते लढले, मराठा समाजाला आरक्षण मिळेल हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 
 

Web Title: Sambhajiraje Chhatrapati reaction over Vinayak Mete Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.