Sambhajiraje Chhatrapati: ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला! संभाजीराजेंची घोषणा; राज्यसभा लढवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 11:40 AM2022-05-27T11:40:43+5:302022-05-27T11:41:18+5:30

Sambhajiraje Chhatrapati Latest News: शिवसेनेबद्दल किंवा अन्य पक्षांबद्दल मला द्वेश नाही. परंतू मला कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठविले, संभाजीराजेंनी सांगितले काय घडले...

Sambhajiraje Chhatrapati will not fight Rajya Sabha election; This is not a retreat, my selfrespect has been saved! Sambhaji Raje's on Shivsena, Uddhav Thackreay | Sambhajiraje Chhatrapati: ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला! संभाजीराजेंची घोषणा; राज्यसभा लढवणार नाही

Sambhajiraje Chhatrapati: ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला! संभाजीराजेंची घोषणा; राज्यसभा लढवणार नाही

Next

छत्रपती संभाजीराजे यांनी आज राज्यसभा निवडणूक लढविणार की नाही यावर पडदा टाकला. मी राज्यभर दौरा करणार असून माझी ताकद मला पहायची आहे. स्वराज्य संघटना उभी करायची आहे. ४२ आमदार माझी ताकद नाही, तर जनता ही आहे, असे संभाजीराजांनी स्पष्ट केले. 

शिवसेनेबद्दल किंवा अन्य पक्षांबद्दल मला द्वेश नाही. परंतू मला कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठविले. ओबेरॉयमध्ये भेट झाली. शिवसेनेत प्रवेश करावा, मी उद्या उमेदवारी जाहीर करतो, असा निरोप होता. परंतू मी त्यांना सांगितले की, मला अपक्ष लढायचे आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी मी ही राज्यसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा संभाजी राजेंनी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला; छत्रपती संभाजीराजे यांचा गौप्यस्फोट

याचबरोबर ही माघार नाही, मी माझा स्वाभिमान जपला. मला कोणच्याही बंधनात अडकायचे नव्हते. अनेक आमदारांनी मला फोन केला होता, निवडणूक लढविण्यास ते सांगत होते. प्रत्येक पक्षाचा अजेंडा असतो, त्यानुसार त्यांना काम करायचे असते. त्याचा मला आदर आहे, ही लोकशाही आहे, असेही ते म्हणाले. यापुढे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. येत्या ६ जूनला शिवराज्याभिषेक साजरा केला जाणार आहे. त्यासाठी राज्यात, देशात किंवा जगभरात जे मावळे असतील त्यांनी या सोहळ्याला यावे, असे निमंत्रणही संभाजीराजेंनी दिले. 

 

Web Title: Sambhajiraje Chhatrapati will not fight Rajya Sabha election; This is not a retreat, my selfrespect has been saved! Sambhaji Raje's on Shivsena, Uddhav Thackreay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.