समीर गायकवाडची दुसऱ्यांदा चौकशी

By admin | Published: April 16, 2016 02:22 AM2016-04-16T02:22:39+5:302016-04-16T02:22:39+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) संशयित आरोपी समीर गायकवाडकडे शुक्रवारी दुसऱ्यांदा कसून चौकशी केली.

Sameer Gaikwad's second investigation | समीर गायकवाडची दुसऱ्यांदा चौकशी

समीर गायकवाडची दुसऱ्यांदा चौकशी

Next

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाने (सीबीआय) संशयित आरोपी समीर गायकवाडकडे शुक्रवारी दुसऱ्यांदा कसून चौकशी केली. कळंबा मध्यवर्ती कारागृहातील अधीक्षक शरद शेळके यांच्या कक्षात समीरवर सुमारे दीड तास प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी ‘सीबीआय’ने दिलेल्या अहवालामध्ये डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे व डॉ. कलबुर्गी या तिन्ही हत्या एकाच विचारांच्या व्यक्तीने केल्या आहेत तसेच एकाच पिस्तुलाने झाल्याचा संशय व्यक्त केला होता. ‘सीबीआय’ ने समीरची बुधवारी ३ तास चौकशी केली. अंडा सेलमधून समीरला बाहेर काढत कारागृह अधीक्षक शेळके यांच्या कक्षामध्ये त्याच्याकडे दीड तास चौकशी केली. (प्रतिनिधी)

जामिनासाठी दोनवेळा केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने समीर गायकवाडने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ढेरे यांच्यासमोर सुनावणी होत आहे. यावेळी त्याच्या बाजूने हिंदू विधिज्ञ परिषदेचे सचिव अ‍ॅड. संजीव पुनाळेकर बाजू मांडणार आहेत.

Web Title: Sameer Gaikwad's second investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.