समीरची ब्रेन मॅपिंग, नार्को तपासणी करणार

By admin | Published: September 25, 2015 02:57 AM2015-09-25T02:57:50+5:302015-09-25T02:57:50+5:30

पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याची लवकरच ब्रेन मॅपिंग आणि नार्को तपासणी करण्यात येणार

Sameer's brain mapping, Narco inspection will be done | समीरची ब्रेन मॅपिंग, नार्को तपासणी करणार

समीरची ब्रेन मॅपिंग, नार्को तपासणी करणार

Next

कोल्हापूर : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याची लवकरच ब्रेन मॅपिंग आणि नार्को तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
समीरला अटक केल्यानंतर त्याने कोल्हापूर पोलिसांना तपासात अपेक्षित सहकार्य केलेले नाही.
त्याची आठ दिवसांची पोलीस
कोठडी बुधवारी संपली. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात
हजर केले असता त्याची पोलीस कोठडी शनिवारपर्यंत वाढविण्यात आली.
गेल्या आठ दिवसांत समीरकडे तपास करताना पोलिसांच्या हाती त्याचे मोबाइलवरील संभाषण हाच ठोस मुद्दा मिळाला आहे. त्याने संकेश्वर येथे कट रचल्याबद्दलही पोलीस माहिती घेत आहेत; पण
तो पोलिसांना तपासकामात अपेक्षित सहकार्य करीत नसल्याने त्याची लवकरच नार्को आणि ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात येणार आहे; पण त्यासाठी समीरची मान्यता घेणे बंधनकारक आहे.
याशिवाय गुजरात येथील गांधीनगर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने त्याचे व्हाईस रेकॉर्डिंग, संभाषण, कॉल डिटेल्स तसेच त्याच्या वर्तणुकीबाबत तपासणी केली होती. त्याचाही अहवाल येत्या दोन दिवसांत
येण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अहवाल आल्यानंतरच त्याच्या कॉलवरील संभाषणांचा बऱ्यापैकी उलगडा होईल.
सांगली येथील त्याच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात जप्त केलेल्या अनेक कागदपत्रांसह सुमारे ३१ मोबाइलच्या सीमकार्डांबाबतही तपासणी करण्यात येणार आहे. ही सीमकार्ड सांगली, मुंबई, ठाणे, पनवेल, गोवा, बेळगाव (कर्नाटक) येथील काही व्यक्तींच्या नावे असल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहेत.
या सर्वांना कोल्हापुरात बोलावून घेऊन त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sameer's brain mapping, Narco inspection will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.