Samruddhi Mahamarg Video: उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळली; एकाचा मृत्यू, सोहळा पुढे ढकलला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 09:49 PM2022-04-25T21:49:24+5:302022-04-25T22:00:32+5:30

Samruddhi Mahamarg accident, one Death: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

Samruddhi Mahamarg accident: Arch of Samruddhi Highway collapsed before inauguration; The ceremony was postponed | Samruddhi Mahamarg Video: उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळली; एकाचा मृत्यू, सोहळा पुढे ढकलला

Samruddhi Mahamarg Video: उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाची कमान कोसळली; एकाचा मृत्यू, सोहळा पुढे ढकलला

googlenewsNext

नागपूर : मुंबईसह नागपूरपर्यंतच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आले आहे. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झाले आहेत. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हा सोहळा किमान दीड ते दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. या महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आले आहेत. त्यापैकी एक सोळाव्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला आहे. यामुळे हे काम पुढील पाच-सहा दिवसांत ते काम पूर्ण होणे अशक्य आहे. तसेच तज्ज्ञांनी आता वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनवण्याचे सुचविले आहे. त्यासाठी आणखी दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

यामुळे नागपूर ते सेलुबाजार दरम्यान समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा किमान दीड ते दोन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण 2 मे रोजी करण्याचे जाहीर करण्यात आले होते. यावरून राजकारणही सुरु झाले होते. गर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेलुबाजार ते वर्धा जिल्ह्यापर्यंत समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची हवाई पाहणीही केली होती. 

समृद्धी तयार, पण त्यावर पोहोचणेच कठीण; आणखी १८ महिने लागण्याची शक्यता
नागपूर-मुंबई हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम नागपूर जिल्ह्यात पूर्ण झाले आहे. लोकार्पणाच्यापूर्वीच वाहनेही धावू लागली आहेत. दरम्यान, लोकार्पणाची तयारीही सुरू झाली आहे. परंतु समृद्धी महामार्ग जेथून सुरू होतो, त्या शिवमडका येथील एन्ट्री पॉईंटपर्यंत पोहोचणे मात्र कठीण काम आहे. ती समस्या लवकर संपण्याची शक्यताही नाही. कारण शिवमडकापर्यंत पोहोचण्याचा रस्ता पूर्ण व्हायला अजून १८ महिने लागण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Samruddhi Mahamarg accident: Arch of Samruddhi Highway collapsed before inauguration; The ceremony was postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.