Samruddhi Mahamarg: 'जमीन देऊ नका सांगायला 'नेते' गावात जायचे, तरीही...'; समृद्धीच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा थेट मातोश्रीवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:33 AM2022-12-12T06:33:30+5:302022-12-12T06:33:59+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली स्वप्नपूर्तीची भावना
समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली तेव्हा अनेकांना हा मार्ग होणारच नाही असे वाटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यावेळचे नेते तर मार्गासाठी अधिग्रहण सुरू असताना विरोध करायला गावांमध्ये जायचे, एकही इंच जमीन देऊ नका, असे आवाहन करत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारे एकनाथ शिंदे यांनी गावांमध्ये जाऊन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पंतप्रधानांच्या उपस्थितीत टीकेची झोड उठवली.
समृद्धीचा संकल्प पूर्ण व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार अन्य समाजघटक अशा सर्वांना विश्वासात घेतले. एकनाथ शिंदे हे पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत होते. या महामार्गासाठी जागेचे अधिवाहन केले, तेव्हा एकही प्रकरण कोर्टात गेले नाही, जमीन अधिग्रहणाचे नवीन मॉडेल आम्ही यासाठी तयार केले आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा वापर करून ५० हजार कोटीचा निधी उभा केला. हे ५० हजार कोटी रुपये पुढच्या दोन वर्षात परत येतील आणि त्यातून आणखी नवे प्रकल्प आम्हाला राज्यात साकारता येणार आहेत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान कार्यालयाच्या वेगवान निर्णयप्रक्रियेचे अभिनंदन केले व मोदी यांचे सर्व प्रकारच्या सहकार्यासाठी आभार मानले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मोपलवार यांचे विशेष कौतुक
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवथापकीय संचालक राधेश्याम मोपलवार तसेच मनोज सोनिका, प्रवीण परदेशी, गायकवाड आटी अधिकायांच्या चमूचे कौतुक केले. प्रकल्पाच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत या चमूच्या प्रयत्नांचा या स्वप्नात मोठा वाटा असल्याचे शिंदे, फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.