Samruddhi Mahamarg: चर्चा तर होणारच! समृद्धी महामार्गावर पहिल्याच दिवशी बैलगाड्यांच्या रांगा; कसे होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 07:18 AM2022-12-12T07:18:43+5:302022-12-12T07:19:08+5:30
पंतप्रधानांचा दौरा, समृद्धीचे लोकार्पण आणि या मार्गामुळे होणारी वेळेची बचत याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, सायंकाळनंतर समृद्धी महामार्गाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होऊ लागला.
रविवारी विदर्भात समृद्धी महामार्गाचीच चर्चा रंगली होती. किती किमी, किती तास वेळ आणि किती तो टोल आदींची चर्चा रंगलेली असतानाच अचानक अनेकांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला होता. यामुळे या समृद्धी महामार्गाचे कसे होणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत होता.
पंतप्रधानांचा दौरा, समृद्धीचे लोकार्पण आणि या मार्गामुळे होणारी वेळेची बचत याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, सायंकाळनंतर समृद्धी महामार्गाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होऊ लागला. समृद्धी महामार्गावर चक्क बैलबंड्यांची रांग चालत असल्याचे दिसून आले. सुरुवातीला हा दुसऱ्या महामार्गाचा व्हिडीओ वाटला. मात्र, पंतप्रधानांचे कटआउटस् व समृद्धीचे बॅनर्स दिसून आले व नेटीझन्सने यावर भन्नाट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
ज्या मार्गावर वाहने १००-१२० किलोमीटरच्या वेगाने जाणार आहेत, तेथे अशा प्रकारे बैलबंड्या येणे व रस्ता व्यापणे, ही बाब धोकादायक ठरु शकते. अनेकांनी या व्हिडीओवर चिंता व्यक्त केली तर काहींनी समृद्धीचे पहिले प्रवासी असा उल्लेख करत हा व्हिडीओ आणखी व्हायरल केला.