Samruddhi Mahamarg Toll Rate: समृद्धीवर किती लागेल टोल? बाबो! शिर्डी-नागपूर प्रवासात तब्बल १८ ठिकाणी टोल नाके

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 06:15 AM2022-12-13T06:15:31+5:302022-12-13T06:16:15+5:30

अवजड वाहनांना ५,८०९ रुपये टोल भरावा लागणार, कारला किती...

Samruddhi Mahamarg Toll Rate: How much toll will be charged on Samruddhi Expressway? 18 toll Plazas on the Shirdi-Nagpur journey | Samruddhi Mahamarg Toll Rate: समृद्धीवर किती लागेल टोल? बाबो! शिर्डी-नागपूर प्रवासात तब्बल १८ ठिकाणी टोल नाके

Samruddhi Mahamarg Toll Rate: समृद्धीवर किती लागेल टोल? बाबो! शिर्डी-नागपूर प्रवासात तब्बल १८ ठिकाणी टोल नाके

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क । मुंबई : राज्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर शिर्डी-नागपूर या पहिल्या टप्प्यावरील प्रवास सुरू झाला आहे. हा पहिला टप्पा ५२० किमीचा असून या प्रवासादरम्यान १८ टोलनाके लागणार आहेत. या टोलनाक्यांवरील टोलची यादी जाहीर झाली असून हलक्या वाहनांना म्हणजेच कारला ८९९ रुपये तर अति अवजड वाहनांना ५,८०९ रुपये टोल भरावा लागणार आहे.

टोलचे दर असे...
वाहनांचा प्रकार                                       २०२२        २०२५        २०२८       २०३१
मोटार, जीप, व्हॅन, हलकी मोटार वाहने     १.७३ रु.    २.०६रु.    २.४५रु.    २.९२रु.
मालवाहतुकीची, व्यावसायिक वाहने, मिनी बस    २.७९ रु.    ३.३२रु.    ३.९६रु.    ४.७१रु.
बस अथवा ट्रक (२ आसांची)    ५.८५ रु.    ६.९७रु.    ८.३०रु.    ९.८८रु.
तीन आसांची व्यावसायिक वाहने    ६.३८ रु.    ७.६०रु.    ९.०५रु.    १०.७८रु.
अवजड बांधकाम यंत्रसामग्री वाहने     ९.१८ रु.    १०.९३रु.    १३.०२रु.    १५.५१रु.
अति अवजड वाह    ११. १७रु.    १३.३०रु.    १५.८४रु.    १८.८७रु.
     (टोलदर प्रतिकिमीसाठी)

टोलच्या परिपत्रकात ११ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतचे (पहिली तीन वर्षे) दर आणि त्यानंतर पुढील प्रत्येक तीन वर्षांनी दरात करण्यात येणारी वाढ देण्यात आली असून दहा वर्षांपर्यंतचे दर निश्चित करण्यात आले आहेत. चार टप्प्यांतील टोलवाढीचा अखेरचा टप्पा हा १ एप्रिल २०३१ ते १० डिसेंबर २०३२ पर्यंतचा असेल.

सूट देण्यात आलेली वाहने
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान,  मुख्य न्यायाधीश, राज्यपाल, उपराज्यपाल, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश,  लोकसभा सभापती, राज्यसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष,  उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश, न्यायाधीश, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, राज्य दौऱ्यावरील परदेशी मान्यवर, लष्कराची वाहने,  केंद्र आणि राज्य सशस्त्र सेना दलाची, पोलिसांची वाहने, रुग्णवाहिका.

नागपूर ते शिर्डी टोल
अंतर : ५२० किमी
वाहनाचा प्रकार : मोटार, जीप, व्हॅन, हलके वाहन
टोलची किमान रक्कम :  ८९९ रु.
बस किंवा ट्रक(दोन एक्सल) : ३,०४२ रु. 
अति अवजड वाहन ५,८०८ रु. 

मुंबई-नागपूर प्रवास सुरू झाल्यावर (अंतर ७०१ किमी)
n मोटार, जीप, व्हॅन, हलके वाहन - सुमारे १,२१२ रु. 
n बस किंवा ट्रक(दोन एक्सल) - सुमारे  ४,१०० रु.
n अति अवजड वाहने - सुमारे ७,८३१ रु.

येथे आहेत नाके
वायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली,  विरूल, धामणगाव (आसेगाव), गावनेर तळेगाव (शिवनी), कारंजा लाड, शेलू बाजार/ वनोजा,  मालेगाव, मेहकर, दुसरबीड, सिंदखेडराजा, निधोणा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, घायगाव-जांबरगाव, कोकमठान
 

Web Title: Samruddhi Mahamarg Toll Rate: How much toll will be charged on Samruddhi Expressway? 18 toll Plazas on the Shirdi-Nagpur journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.